शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवे बळ, भंते ससाई यांच्या उपस्थितीत आकाश लामा व भंते विनयाचार्य एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 21:48 IST

एकीने लढण्याचा केला निर्धार

नागपूर : महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आता बेकीने नव्हे तर एकीने लढण्याचा निर्धार आकाश लामा आणि भंते विनयाचार्य यांनी दीक्षाभूमीवर व्यक्त केला. रविवारी भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दोघांनीही संघटीतपणे एल्गारची हाक दिली. त्यामुळे महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. दीक्षाभूमीच्या सभागृहात हे तिघेही भंतेगण हातात हात घालून एकत्र आल्याने उपस्थित हजारो धम्मबांधवांनी आनंद व्यक्त केला.

बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी २०४ दिवसांपासून महाविहार मुक्तीचे आंदोलन सुरू आहे. दरम्यानच्या काळात विसंवादामुळे दोन्ही भंते वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मशाल मार्च व धम्मध्वज यात्रा नागपुरातूनच सुरू केली होती. मात्र, बौध्दांना असे वेगळे होणे अमान्य होते. एकत्र यावे यासाठी अनुयायी रेटा लावून होते. समाजबांधवांचा दबाव बघून दोघांनीही एकाच विचापीठावर येण्याचे मान्य केले. त्यानुसार, रविवारी पवित्र दीक्षाभूमीतील सभागृहाच्या धम्ममंचावर या दोन्हींसोबत भंते ससाईही आले. त्यांनी दोघांचेही हात हातात घेऊन संघटितपणे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या दोन्ही भंतेंनी बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून, महाविहार बौध्दांच्या हातात देण्यासाठी आंदोलन व दबाव वाढविण्याचा निर्णय घेतला.

यावेळी भंते विनयाचार्य यांनी २ सप्टेंबर रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर होणाऱ्या संकल्प कार्यक्रमात आकाश लामा यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला लगेच होकार देत लामा यांनी दिल्लीतील कार्यक्रम रद्द करून चैत्यभूमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली.संचालन बाळू घरडे यांनी केले. धम्ममंचवर सुनील सारीपुत्त, नितीन गजभिये उपस्थित होते. त्यापुवीं, आंबेडकरी गायक प्रकाशनाथ पाटणकर यांनी एकाहून एक सरस बुध्द व धम्मगीते सादर केले.

- दोन्ही भंते एकाच धम्ममंचावर आल्याने आंदोलनास बळ मिळेल. आगामी काळात आंदोलनाची दिशा ठरवावी. यापुढची सर्व आंदोलने संघटितरीत्या झाल्यास महाबोधी आंदोलनाला निश्चितच यश मिळेल.

- भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी

महाबोधीचे आंदोलन एकत्र व्हावे यासाठी धम्मगुरू भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई व दाजिंलींगचे भंते खेनचेन संगाय लोडई यांची प्रेरणा मिळाली. त्यामुळे हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. संघटित लढयातून महाविहार बौध्दांच्या ताब्यात घेऊ.-भंते आकाश लामामहाबोधी मुक्ती चळवळ ही आता भारत नव्हे तर जागतिक स्तरावर बौध्दांच्या अस्मितेशी जुळली आहे. केवळ महाबोधी महाविहार आमच्या अस्तित्वाचे आणि अस्मितेचे प्रतिक असल्याने, संघटीतपणे लढणे ही काळाची गरज होती. आता आंदोलनास अधिक बळ मिळेल.-भंते विनयाचार्य