शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली  : नागपूर विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समारंभात त्यांच्याच नावावर असलेले पदक गुणवंत विद्यार्थिनीला देण्यात आले. ही बाब विद्यापीठातील अधिकाऱ्यांना खटकली असून कुठलाही आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या नावावरील पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रांच्या नावावरील पदकावर संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समारंभात त्यांच्याच नावावर असलेले पदक गुणवंत विद्यार्थिनीला देण्यात आले. ही बाब विद्यापीठातील अधिकाऱ्यांना खटकली असून कुठलाही आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या नावावरील पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वाङ्मय चौर्यप्रकरणात दोषी ठरलेल्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्याकडून गांधी विचारधारेची पदविका विद्यापीठाने काढून घेतली. तसेच विद्यापीठाच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून त्यांचे नावही लगेच काढण्यात आले. मात्र, त्यांच्या नावावर देण्यात येणारे दीक्षांत समारंभातील सुवर्णपदक अद्यापही कायम आहे. विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात हे पदक एमएडच्या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आले. यानंतर हे पदक रद्द करण्यात येईल का अशी विद्यापीठ वर्तुळात चर्चादेखील रंगली होती. परंतु नियमानुसार असे करणे शक्य नाही. नियमांत पदक रद्द करण्याची तरतूदच नाही. त्यासाठी विद्यापीठाला नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनी आतापर्यंत तर पदक रद्द करण्याची कधीही वेळ आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु एखादे पदक रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असायला हवेत. एखादी व्यक्ती दोषी आढळली असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने पदक देणे योग्य राहणार नाही. पदक रद्द करण्यासंदर्भात नियमांत बदल आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर