शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या ७०,७७८ कर्मचाऱ्यांना नवीन पेंशनचा लाभ

By नरेश डोंगरे | Updated: August 26, 2024 23:05 IST

युनिफाइड पेन्शन योजना : मध्य रेल्वे महाव्यवस्थापक, व्यवस्थापकांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने मंत्रिमंडळात २४ ऑगस्टला युनिफाइड पेन्शन योजना (यूपीएस) मंजूर केली. १ एप्रिल २०२५ पासून ती लागू होणार असून मध्य रेल्वेत कार्यरत ७० हजार ७७८ कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी सोमवारी या संबंधाने पत्रकार परिषद घेतली. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून महाव्यवस्थापक राम करण यादव व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी येथील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मध्य रेल्वेत सध्या ९६,०३९ कर्मचारी आहेत. त्यातील ७०,७७८ कर्मचारी म्हणजे ७३.६९ टक्के कर्मचारी नवीन पेन्शन योजनेचे सदस्य असून त्यांना यूपीएसचा लाभ मिळणार असल्याचे अधिकारी म्हणाले. अशाच प्रकारची दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषदेत दिली.

नवीन पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेचे सध्याचे योगदान दरमहा ४५.५ कोटी रुपये असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. यूपीएसच्या तरतुदी एनपीएसच्या माजी (जे आधीच सेवानिवृत्त झाले आहेत) सेवानिवृत्तांनाही लागू होतील. त्यांना मागील कालावधीची थकबाकी व्याज पीपीएफ दरांसह दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना युनिफाइड पेन्शन योजना (यूपीएस)ची वैशिष्ट्ये सांगितली.

यूपीएसची वैशिष्ट्ये

यूपीएसची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांना पर्याय म्हणून यूपीएस उपलब्ध असेल. विद्यमान तसेच भविष्यातील कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएसमध्ये सामील होण्याचा पर्याय असेल. मात्र, एकदा ठरवल्यानंतर ती निवड अंतिम राहणार आहे. कर्मचाऱ्यांचे योगदान वाढणार नाही. यूपीएस लागू करण्यासाठी सरकार अतिरिक्त योगदान देईल. या योजेनत सरकारी योगदान १४ टक्केवरून १८.५ टक्के वाढणार असल्याचे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे