शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या जिल्हा न्यायालयात नवीन जनरेटर बसवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:10 IST

लिफ्टसाठी पॉवर बॅकअप व अन्य आकस्मिक सेवांकरिता जिल्हा न्यायालयामध्ये २० दिवसात नवीन जनरेटर बसविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.

ठळक मुद्देपीडब्ल्यूडीला २० दिवसाची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लिफ्टसाठी पॉवर बॅकअप व अन्य आकस्मिक सेवांकरिता जिल्हा न्यायालयामध्ये २० दिवसात नवीन जनरेटर बसविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.जिल्हा न्यायालयातील समस्यांसंदर्भात जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी महासचिव मनोज साबळे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जिल्हा न्यायालयासाठी ५०० केव्हीएडीजी जनरेटर सेट खरेदी करण्यात आला असून तो सेट ४० दिवसात बसविण्यात येईल अशी माहिती दिली. परंतु, उच्च न्यायालयाने एवढा वेळ देण्यास नकार देऊन हे काम २० दिवसात पूर्ण करण्यास सांगितले.प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, जिल्हा न्यायालयात सध्या असलेला ६२.५ केव्हीए डिझेल जनरेटर सेट १९६८ मध्ये खरेदी करण्यात आला होता. तो सेट कालबाह्य झाला असून त्याची दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे नवीन सेट खरेदी करण्यात आला आहे. तसेच, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी २८ मार्च २०१९ रोजी पत्र पाठवून सांगितलेल्या १६ पैकी १४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अग्निसुरक्षा उपायांकरिता ११ जून २०१९ रोजी निविदा नोटीस जारी करण्यात आली आहे. नवीन अग्निशमन उपकरणे बसविण्यासाठी गेल्या १२ जून रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हे काम ४० दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.अहवाल सादर करण्याचा आदेशसार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिज्ञापत्र व न्यायालयाच्या आदेशानुसार कृती केली अथवा, नाही याचा अहवाल पुढील तारखेपर्यंत सादर करावा असे उच्च न्यायालयाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना सांगितले. तसेच, लिफ्ट देखभालीची जबाबदारी असलेल्या थायसेनक्रप कंपनीला याचिकेत प्रतिवादी केले व कंपनीला नोटीस बजावून पुढील तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय