शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीने हातमाग क्षेत्रातील संधी शोधाव्यात :आयुक्त माधवी खोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:11 IST

ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात , असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय हातमाग दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात. शासनाच्या इंद्रायणी अ‍ॅपच्या धर्तीवर विणकर सेवा केंद्रानेही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी येथे केले.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत सिव्हील लाईन्स येथील विणकर सेवा केंद्र येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक वाय. के. सूर्यवंशी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वदेशी चळवळीचा प्रारंभ दिन म्हणून ७ ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून २०१७ पासून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे साजरा करण्यात येतो. पुढील राष्ट्रीय हातमाग दिवस भुवनेश्वर येथे साजरा होणार आहे. विणकर सेवा केंद्रातील प्रशिक्षणार्थींना बुटीक, फॅशन डिझायनिंग यासारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे खोडे यांनी साांगितले.पार्डीकर म्हणाले, हातमाग उत्पादनासंदर्भात योग्य प्रचार व प्रसार गरजेचा आहे. सूर्यवंशी म्हणाले, हातमाग हा भारतीय परंपरेचा भाग असून, लुप्त होत असलेल्या या कलेचे पुनरुज्जीवन करण्यात विणकरांचे योगदान महत्त्वाचे आहे.याप्रसंगी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विणकर आणि तरुण उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर आणि विणकर सेवा केंद्र, यंत्रमाग सेवा केंद्र या कार्यालयातील अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपास्थित होते. संचालन विणकर सेवा केंद्राचे सौम्य श्रीवास्तव यांनी केले तर तंत्रज्ञान अधीक्षक पुनित पाठक यांनी आभार मानले.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगnagpurनागपूर