शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संधीसोबतच नवे आव्हान

By admin | Updated: April 27, 2017 02:26 IST

देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला राजकीय, सांस्कृतिक व प्रशासकीयदृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे.

अश्विन मुदगल : महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला नागपूर : देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला राजकीय, सांस्कृतिक व प्रशासकीयदृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे सकारात्मक नेते या शहरात आहेत. अशा शहराचा विकास करण्यासाठी महापालिका आयुक्त म्हणून मिळालेली जबाबदारी एक मोठी संधी आहे. सोबतच आव्हानही असल्याचे प्रतिपादन आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. महापालिका मुख्यालयात मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अश्विन मुदगल यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. दिवसभरात अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख व झोनचे सहायक आयुक्त यांच्याशी चर्चा करून कामकाजाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांना प्रथमच संधी मिळाली आहे. तीही वेगाने विकास होत असलेल्या नागपूरसारख्या शहराच्या आयुक्तपदाची जबाबदारी मिळाली आहे. पदाधिकारी व अधिकारी तसेच नागरिकांशी समन्वय ठेवून शहरातील विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना सक्षमतेने राबविली जावी. तसेच सुरू असलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्याला प्राधान्य राहील. महापालिकेचा कारभार पारदर्शी राहील अशी ग्वाही मुदगल यांनी दिली.महापालिकेतील महत्त्वाची व तांत्रिक स्वरूपाची ३४ टक्के पदे रिक्त आहेत. ती भरण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात न्यायालय व शासनाचे आदेश प्राप्त झाले आहे. काही विभागांचा आकृतिबंध तयार आहे. त्यानुसार लवकरच पदभरती करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी) आर्थिक शिस्तीला प्राधान्य महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. याबाबतची विस्तृत माहिती घेऊ न यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. करवसुली अधिक सुलभ करून अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा प्रयत्न राहील. मनपाला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करू. आर्थिक स्थितीचा विकास प्रकल्पांवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नदी स्वच्छता अभियानाला गती शहराचा ऐतिहासिक वारसा अलेली नागनदी तसेच पिवळी व पोहरा नदी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल. शहरातील नद्यात प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जाते. यामुळे या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती मुदगल यांनी दिली. उपराजधानी स्मार्ट सिटी होईल स्मार्ट शहरांच्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. ३३३५ कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार नाही. १००० कोटीचा निधी केंद्र, राज्य सरकार आणि नासुप्र खर्च करणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे.