शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस; रोज ८ ते १० हजार प्रवाशांची भर पडणार

By नरेश डोंगरे | Updated: April 25, 2025 20:23 IST

लांब पल्ल्याच्या प्रवासावर पाठविणार, प्रवाशांना मिळणार 'नॉन स्टॉप'चा लाभ...

नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाच्या ताफ्यात आणखी २० नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच या गाड्या आल्यामुळे एसटीच्या तिजोरीतही चांगली भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एसटीच्या नागपूर विभागात आठ डेपो (आगार) असून सध्यस्थितीत या आगारातून एकून ४१५ बसेसचे संचलन होते. यातील बऱ्याच बसेस जुन्या असल्याने कधी ही तर कधी ती बस रस्त्यात बंद पडत असते. अशात उन्हाळ्यात लग्नसराईची धूम असल्याने प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. बसस्थानकावर सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक बस प्रवाशांची खच्चून भरून धावत असल्याचेही दिसून येते. प्रवाशी जास्त आणि बसेस कमी असल्याने अनेकदा कोणत्या मार्गावर बसेस पाठवायची आणि कोणत्या मार्गावर प्रवाशांना 'थांबा'चा संदेश द्यायचा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो. या स्थितीमुळे स्थानिक अधिकाऱ्यांकडून महामंडळाच्या शिर्षस्थांकडे यापूर्वी नवीन बसेस देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, आता आणखी २० नवीन डिझेल बसेस एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला मिळाल्या आहेत.आरामदायक आसन अन् बरेच काही...या २० बसेसपैकी १० गाड्या गणेशपेठ बस आगाराला, ५ इमामवाडा आणि ५ बसेस रामटेक आगाराला मिळाल्या आहेत. नवीन बसेस असल्यामुळे या बसेस छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेडसारख्या लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशी सेेवेत पाठविण्यात येणार आहेत. नवीन बसेसची आसन व्यवस्था आरामदायक आहे. पूश करून सिट मागेपुढे करता येते. तसेच या गाड्यांमध्ये अलार्म सिस्टम आणि दुसऱ्याही काही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्रवासी वाढणार अन् उत्पन्नहीनागपूर विभागातून दररोज सुमारे दीड लाख ते १ लाख, ६० हजार प्रवासी प्रवास करतात. आता ४४ सिटर या नवीन बसेसची त्यात भर पडल्यामुळे आणखी ८ ते १० हजार प्रवासी वाढणार आहेत. अर्थात एसटीच्या नागपूर विभागाच्या तिजोरीला त्याचा चांगला फायदा होणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर