शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:35 IST

नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर दिसताहेत राखेचे ढिगारे : निर्माण खर्चातही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अ‍ॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करण्यात आला आहे.खापरी रेल्वे फ्लायओव्हरच्या दोन्ही मार्गासाठी फ्लाय अ‍ॅश मागविण्यात आली आहे. फ्लायओव्हरच्या कन्स्ट्रक्शन साईडच्या रिटेनिंग वॉलच्या मधात फ्लाय अ‍ॅश टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे राखेच्या टेकड्या दिसून येत आहेत. फ्लाय अ‍ॅशमध्ये सिमेंटिंग मटेरियल मिळवून रस्त्याच्या निर्मितीत वापर केला जात आहे. रस्तेनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत फ्लाय अ‍ॅशचा वापर होत आहे.केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फ्लाय अ‍ॅशच्या उपयोगामुळे बोल्डर, दगड, मातीची आवश्यकता राहिलेली नाही. विद्युतनिर्मिती प्रकल्पातून नि:शुल्क फ्लाय अ‍ॅश मिळत असल्याने पुलाच्या निर्मितीचा खर्चही कमी येत आहेथर्ड पार्टी इन्स्पेक्शनची रेल्वेने ठेवली अटएनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खापरीच्या नव्या पुलाचे निर्माणकार्य ५० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे पोर्शनमध्ये निर्माण कार्यासाठी मध्य रेल्वेला तीन महिन्यापूर्वी पूर्व ब्लॉक मागितला होता. परंतु आतापर्यंत ब्लॉक मिळालेला नाही. उलट रेल्वेकडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एनएचएआय थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याचा अहवाल रेल्वेला देईल. अहवालाच्या आधारावर रेल्वेद्वारे ब्लॉक दिल्यानंतर पुलाचे निर्माणकार्य येणाऱ्या जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर