शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात नवीन गहू व चण्याची आवक; गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले : पावसामुळे उशिरा आवक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 13, 2024 20:31 IST

कळमन्यात गव्हासोबतच चणा विक्रीचाही शुभारंभ झाला. नवीन चण्याला ६ हजार ते ६३५० रुपये क्विंटल भाव मिळाला.

नागपूर : मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याच्या ओलावारी गावातील मिल क्वालिटी गव्हाच्या १०० पोत्यांच्या लिलावाने कळमना धान्य बाजारात सोमवारी विक्रीचा शुभारंभ झाला. गव्हाला २६५१ ते २६७१ रुपये क्विंटल भाव मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत गव्हाला ४०० रुपये जास्त भाव मिळाला. यावर्षी पावसामुळे शरबती गहू कळमन्यात विक्रीसाठी येण्यास उशीर झाला आहे.

कळमन्यात गव्हासोबतच चणा विक्रीचाही शुभारंभ झाला. नवीन चण्याला ६ हजार ते ६३५० रुपये क्विंटल भाव मिळाला. जुन्या चण्याचा भाव ५२०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे. नवीन चण्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी आहेत. गेल्यावर्षी मुहूर्तावर चण्याला प्रति क्विंटल ४५०० ते ५ हजार रुपये भाव मिळाला होता. दररोज ४५०० ते ५ हजार पोत्यांची (क्विंटल) आवक आहे. याशिवाय यंदा आवक कमी असल्याने तूरीचे भाव वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या प्रति क्विंटल ७५०० ते ८५०० रुपयांच्या तुलनेत यंदा तूरीला दर्जानुसार सर्वाधिक ९२०० ते १०,१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. दररोज ४ ते ५ हजार पोत्यांची आवक आहे. १५ ते २० दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.यावर्षी उठाव नसल्याने सोयाबीनच्या भावात वाढ झालेली नाही. उलट भाव कमी होत आहेत. सध्या दर्जानुसार प्रति क्विंटल ३,९०० ते ४,५०० रुपये भाव आहेत. काही वर्षांपासून शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्यामुळे उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे.

पावसामुळे आवक उशीरायावर्षी पावसामुळे गहू आणि चणा पिकाला उशीर झाला. वेळेवर पीक आले असते तर कळमन्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असती. गहू, चणा आणि तूरीची आवक नागपूर जिल्हा आणि लगतच्या राज्यातून सुरू आहे.कमलाकर घाटोळे, पदाधिकारी, कळमना धान्य बाजार असोसिएशन.

टॅग्स :Farmerशेतकरी