शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोलेरोच्या धडकेत भाचा ठार, मामा गंभीर

By दयानंद पाईकराव | Updated: June 20, 2023 20:56 IST

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप वाहनाने धडक दिल्यामुळे १३ वर्षाचा भाचा जागीच ठार झाला तर मामा गंभीर ...

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप वाहनाने धडक दिल्यामुळे १३ वर्षाचा भाचा जागीच ठार झाला तर मामा गंभीर जखमी झाल्याची घटना पारडी पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास घडली.

आयुष संतोष मिश्रा (वय १३) असे या अपघातात ठार झालेल्या भाच्याचे नाव आहे. आयुषचे मामा अजय हे बहिणीच्या घरीच राहतात आणि ई रिक्षा चालवितात. आयुष आपले मामा अजय रमाशंकर दुबे (वय २५, रा. सत्यमनगर, पारडी) यांच्यासह दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, बी. व्ही-६७०७ ने पारडी चौकात कामानिमित्त आला होता. काम आटोपून ते भंडारा रोडने घरी परत जात होते. तेवढ्यात मागून येणाºया बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच. ४०, बी. एल-१८२३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.

घटनेनंतर बोलेरो चालक आपले वाहन तेथेच सोडून पळून गेला. अपघातात दुबे आणि त्यांचा भाचा आयुष गंभीर जखमी झाले. तेथे जमलेल्या नागरिकांनी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आयुषला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दुबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर