शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST

केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

ठळक मुद्दे केरळमध्ये नऊ जणांचा बळी : आरोग्य विभागाने काढले खबरदारीचे पत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.केरळमध्ये या व्हायरसचा (विषाणू) इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य २५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारिकेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याला गंभीरतेने घेत मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात रात्री ११ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. कांबळे म्हणाले, सध्या तरी या ‘व्हायरस’चे रुग्ण महाराष्टÑात आढळून आलेले नाहीत. याच्यावर लस उपलब्ध नाही. परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजनेच्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या, मंगळवारी यावर परित्रक काढून सर्व आरोग्य अधिकाºयांना ते पाठविण्यात येईल. काय आहे निपाह?निपाह व्हायरस संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. सध्या यावर लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पहिल्या १० जीवघेण्या आजारात या निपाह व्हायरसचा समावेश आहे. या आजाराची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते.लक्षणेताप, डोके दुखणे, अशक्तपणा, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणे आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. यावर उपचार नसल्याने आजारी डुक्कर, वटवाघूळ यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला केरळमध्ये देण्यात येत आहे. फळ खाणारे वटवाघूळ विषाणूचे वाहकउपलब्ध माहितीनुसार, या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या घरात वटवाघूळांनी चावा घेतलेले आंबे आढळून आले. यामुळे फळ खाणारे वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक वाहक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर