शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 20:46 IST

पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

ठळक मुद्देरविवारी नाल्यात वाहून गेला : दोन बोटीच्या साहाय्याने नाग व पिवळी नदीतही शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

रविवारी जोरात पाऊस येत होता. दरम्यान, नेहल आपल्या मित्रासह पाण्याने भरलेला नाला पाहण्यासाठी गेला होता. डॉ. कनोजे यांच्या दवाखान्याजवळ नाल्यावर असलेल्या पोलवरून जात असताना अचानक नेहलचा पाय घसरला आणि वाहून गेला. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी शोधमोहीम हाती घेतली.परंतु नेहलचा शोध लागला नाही.
कळमना हद्दीतील लक्ष्मीनगर भरतवाडाजवळ हा नाला नागनदीला जाऊन मिळतो. त्यामुळे सोमवारी जबलपूर महामार्ग, महालगाव, पेवठा तसेच नाग व पिवळी नदीत दोन बोटींच्या साहाय्याने तर एका बोटीने नाल्यात शोधमोहीम राबवली परंतु यश मिळाले नाही.अग्निशमन विभागाच्या कळमना, गंजीपेठ व सक्करदरा केंद्राच्या पथकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्यासह केंद्राचे प्रमुख अधिकारी शोधमोहीम राबवत आहते. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली आहे. मौदा पोलिसांनाही कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.नेहलच्या घरी शोकाकुल वातावरण
नेहल पाचव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील शेखर मेश्राम हे ट्रकचालक आहेत. तर आई गृृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. नेहल नाल्यात वाहून गेल्यापासून त्याच्या घरी शोकाकुल वातावरण आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीnagpurनागपूर