दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 07:36 PM2020-07-20T19:36:55+5:302020-07-20T20:46:52+5:30

पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

Nehal was not found the next day | दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही

दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही

Next
ठळक मुद्देरविवारी नाल्यात वाहून गेला : दोन बोटीच्या साहाय्याने नाग व पिवळी नदीतही शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.


रविवारी जोरात पाऊस येत होता. दरम्यान, नेहल आपल्या मित्रासह पाण्याने भरलेला नाला पाहण्यासाठी गेला होता. डॉ. कनोजे यांच्या दवाखान्याजवळ नाल्यावर असलेल्या पोलवरून जात असताना अचानक नेहलचा पाय घसरला आणि वाहून गेला. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी शोधमोहीम हाती घेतली.परंतु नेहलचा शोध लागला नाही.

कळमना हद्दीतील लक्ष्मीनगर भरतवाडाजवळ हा नाला नागनदीला जाऊन मिळतो. त्यामुळे सोमवारी जबलपूर महामार्ग, महालगाव, पेवठा तसेच नाग व पिवळी नदीत दोन बोटींच्या साहाय्याने तर एका बोटीने नाल्यात शोधमोहीम राबवली परंतु यश मिळाले नाही.
अग्निशमन विभागाच्या कळमना, गंजीपेठ व सक्करदरा केंद्राच्या पथकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्यासह केंद्राचे प्रमुख अधिकारी शोधमोहीम राबवत आहते. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली आहे. मौदा पोलिसांनाही कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.

नेहलच्या घरी शोकाकुल वातावरण

नेहल पाचव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील शेखर मेश्राम हे ट्रकचालक आहेत. तर आई गृृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. नेहल नाल्यात वाहून गेल्यापासून त्याच्या घरी शोकाकुल वातावरण आहे.

Web Title: Nehal was not found the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.