शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:24 IST

हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहार्मोनल बदलांमुळे होतात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल

आॅनलाईन लोकमतनागपूर : हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, घरात सकारात्मक संवाद साधत असताना एकमेकाना ‘स्पेस’ व वरिष्ठांना योग्य आदर मिळायला हवा. हे सगळं किशोरवयीन मुले न्याहाळत असतात. जर घरातील वातावरण सकारात्मक असेल तर हॉर्मोनल बदलांमुळे होणाऱ्या समस्यांवर मात करता येते. मुलींविषयी अधिक माहिती देताना डॉ. गावंडे म्हणाले, १२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे असते. या वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता, वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. पण, त्यावर योग्य वेळी उपाय करणेही गरजेचे असते.१०० पैकी ४० बालकांना बालदमा- डॉ. देशमुखबालदम्यासंबंधी इनहेलरपेक्षा तोंडाद्वारे घेण्याच्या गोळ्या जास्त प्रभावी आहे; असा पालकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, अनेक वर्षाची संशोधने व वैद्यकीय अभिप्रायांनी हे सिद्ध झाले आहे की, मुखाद्वारे घेण्याच्या औषधांपेक्षा इनहेलर अर्थात श्वासाद्वारे घेण्याची औषधे अधिक सुरिक्षत, प्रभावी आणि सोपी असतात, अशी माहिती डॉ. संजय देशमुख यांनी दिली. डॉ. देशमुख म्हणाले की, वाफेद्वारे, प्रेशरपंपद्वारे आणि पार्टिकल कॅप्सुल अशी तीन प्रकारची इनहेलर असतात. त्यापैकी कुठल्याही इनहेलरचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदूषणामुळे बालदम्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगत त्यांनी १०० पैकी ४० बालकांना बालदमा असल्याची माहिती दिली. मात्र, बालदमा शंभर टक्के बरा होतो, असा विश्वास दाखवत डॉक्टर देशमुखांनी प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीपासून बालकांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर