शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सिद्धीच्या कामात हयगय : ३३२ शाळा कारवाईच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:13 IST

शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत स्वयंमूल्यमापनाचे काम नाही केल्यास खासगी शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याचा तर सरकारी शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या मान्यता रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत स्वयंमूल्यमापनाचे काम नाही केल्यास खासगी शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याचा तर सरकारी शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४०७३ पैकी ३७४१ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे. तर ३३२ शाळांचे मूल्यमापनाचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ या वर्षासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे. शाळांची ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बाधक ठरत आहे. शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. यात नागपूर जिल्हा माघारला आहे. राज्यामध्ये नागपूर जिल्हा प्रथम दहाच्या बाहेर असून, अद्याप जिल्ह्यातील ३३२ शाळांनी आपली माहिती सादर केली नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यातील १००९ शाळांना शाळा सिध्दीमध्ये ‘अ’श्रेणी प्राप्त केली होती.गटशिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्षनागपूर, हिंगणा व पारशिवनी हे तालुके माघारले आहे. येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शिक्षण विभागाने या गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुक्याची जबाबदारी सोपविलेल्या निर्धारकांची नावे मागविण्यात आली होती. मात्र, आजवर त्यांनी निर्धारक (जबाबदार) अधिकाऱ्यांची नावे दिली नाही.

 

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर