शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नीटमध्ये योग्य उत्तराला चुकीचे ठरवले : विद्यार्थ्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:26 IST

गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे हायकोर्टात रिट याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.गेल्या ५ मे रोजी नीट परीक्षा झाली. ३ जून रोजी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिका पी-५ मधील १५२ व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय-१ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ५ जून रोजी सुधारित उत्तरपत्रिका जाहीर करून पर्याय-४ योग्य उत्तर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, निकाल जाहीर झाला व याचिकाकर्त्याला ७२० पैकी ४६५ गुण मिळाले. रसायनशास्त्राच्या अनुभवी शिक्षकांनुसार, पर्याय-१ हेच योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे उत्तर नमूद करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ गुण (उत्तराचे ४ व चुकीच्या उत्तरासाठी कापलेला १ गुण) मिळणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात नीट सेलकडे तक्रार करूनही काहीच दिलासा मिळाला नाही असेदेखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे.केंद्र सरकारला नोटीसप्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव, नीट सेलचे वरिष्ठ संचालक, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक व राज्य सीईटी सेल यांना नोटीस बजावून यावर २६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. नहुश खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी