शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्राण गेला तरी नाणार नाही म्हणजे नाहीच - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 21:51 IST

नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली.

नागपूर : नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. यावेळी त्या म्हणाला की, कोकणवासीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. त्यामुळे प्राण गेला तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. तसेच, सभागृहात शिवसेनेने मांडलेल्या भूमिकांची माहिती त्यांनी आंदोलनात सहभागी जनतेला दिली.

नीलम गो-हे यांनी दिलेली माहिती...

- माधव गाडगीळ समितीने हा परिसर इको सेन्सिटिव्ह घोषित केला आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये नाणार प्रकल्प लादणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच पर्यावरणावर काय परिणाम ते तपासणार आहेत.- मुख्यमंत्री यांनी विधानपरिषदेत रिफायनरी प्रकल्प हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर करण्यासाठी झाला आहे. - सुभाष देसाई यांनी नाणार येथील जमीन अधिग्रहण थांबविण्यात यावे याबाबत ठराव दिला हे मुख्यमंत्री यांनी मान्य केले. तसेच जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय माझ्या अखत्यारीत असल्याने मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना ही कोकणवासीयांच्या सोबत आहे हे पाहिल्यानंतर शिवसेनेवर टिककरणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.  - जसा रायगड सेझ, पुणे दाऊ प्रकल्प रद्द केले तसा हाही रद्द करू, शिवसेना स्थानिक नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. 

- कुठल्याही परीस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.

यावेळी रविंद्र वायकर रत्नागिरी पालकमंत्री, आ.सुनील प्रभू, स्थानिक आमदार राजन साळवी, आ.सदानंद चव्हाण, आ.वैभव नाईक, आ.प्रताप सरनाईक, आ.अजय चौधरी, आ.विलास पोतनीस, आ.प्रकाश आबीटकर, आ.प्रकाश फातर्पेकर हे उपस्थित होते.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेnagpurनागपूरnanar refinery projectनाणार प्रकल्प