शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्र मजबूत करण्याची गरज’ - गजेंद्रसिंह शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:42 IST

उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.

नागपूर : उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.शेखावत यांनी शनिवारी ‘लोकमत भवना’ला सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय चमूसोबत चर्चा केली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.कृषी क्षेत्राचे तीन कारणांमुळे नुकसान झाले आहे. ६२ टक्के कृषीक्षेत्र भूजलावर अवलंबून असून पाणीपुरवठा अपुरा आहे. रासायनिक खतांच्या अतोनात वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे आणि तिसरे कारण म्हणजे कौटुंबिक विभाजनामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. देशात भूधारकाकडे सरासरी ०.८ एकर जमीन असल्यामुळे शेती अप्रभावी झाली आहे, असे शेखावत यांनी सांगितले.शेखावत यांनी उद्योजक म्हणून इथियोपिया आणि आॅस्ट्रेलिया या देशांमध्ये १२ हजार एकर जमीन घेतली आहे. आॅस्ट्रेलियातील लोकशाही सरकारतर्फे विदेशी गुंतवणूकदारांना पाच वर्षांपर्यंत कर माफ करून कृषी जमीन लीजवर दिली जाते. पाच वर्षांनंतर जमिनीतून होणाºया उत्पन्नावर ३० टक्के आयकर द्यावा लागतो. इथियोपिया येथील बहुतांश जमीन पडीक असून या जमिनीचा एक मीटरपर्यंतचा थर उपजाऊ आहे. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते. भारतात हा थर केवळ १० इंच आहे. आदीस अबाबाजवळील जमीन गुलाबाच्या फुलांसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे इथियोपिया जगात सर्वाधिक फूल उत्पादक देश बनला आहे. इथियोपिया भारतीय गुंतवणूकदारांना तेलबियांच्या कंत्राटी शेतीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विजय दर्डा यांनी ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट अ‍ॅण्ड स्ट्रेट थॉट्स’ हे पुस्तक आणि ‘लोकमत समाचार’चा ‘अत्त दीप भवो’ हा दिवाळी अंक शेखावत यांना भेट दिला.

टॅग्स :Farmerशेतकरी