शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देश एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज : प्रेमकुमार बोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला. आज धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देछत्रपती शिवराय संयुक्त नागरी जन्मोत्सव २०१९

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला. आज धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मंगळवारी केले.मराठा सेवा संघ, बानाई, जमाते इस्लामे हिंद व सर्वशाखीय कुणबी संघटनातर्फे छत्रपती शिवराय संयुक्त नागरी जन्मोत्सव २०१९ निमित्त सुर्वेनगर येथील सेवा संघाच्या लॉनवर आयोजित ‘छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष धोरण, आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान देताना बोके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे होते.व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, माजी मंत्री विनोद गुडधे-पाटील, ओबीसी महासंघाचे नेते प्रा. बबनराव तायवाडे,अनंतराव घारड,बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे,बानाईचे माजी अध्यक्ष प्रदीप नगराळे, अखिल कुणबी समाज अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, जमाते इस्लामी हिंद नागपूर मध्यचे अध्यक्ष अशरफ बेलीम, जमाते इस्लामी हिंद, नागपूर शहर (महिला)अध्यक्ष डॉ. साबिहा खान,कुणबी सेनेचे अध्यक्ष सुरेश वर्षे, डॉ.जयेश तिमाने, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम कडू, झाडे कुणबी समाज अध्यक्ष राजेश चुटे, जाधव कुणबी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष प्रा.दिनकर जिवतोडे, अखिल तिरळी कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील राऊ त, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष चंदकांत नवघरे, बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष दत्तू निंबर्ते, अ.भा. खेडुले कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामकृष्ण ठेंगडी, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीचे साहेबराव करडभाजने, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके, कार्याध्यक्ष श्याम डहाके, शहर अध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, जिजाऊ बिग्रेडच्या विभागीय अध्यक्ष सुनीता जिचकार, जिल्हाध्यक्ष जया देशमुख, जिजाऊ बिग्रेडच्या शहराध्यक्ष अनिता ठेंगरे, संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष अभिजित दळवी आदी उपस्थित होते.प्रेमकुमार बोके म्हणाले, ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधनातून शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार घराघरात पोहोचविण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाचा हाच प्रयत्न आहे. म्हणूनच आज जगभरातील ५० देशात शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंती हा बहुजन समाजाचा उत्सव झाला आहे. शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला असल्याने नवीन पिढीला त्यांचा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे.मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधन मेळावे आयोजित करून शिवरायांचा विचार देशभर पोहोचविण्याचे प्रयत्न असल्याचे मधुकर मेहकरे यांनी सांगितले.पी.एस.खोब्रागडे म्हणाले, शिवाजी महाराज मुस्लीम, दलित व बहुजनांचे राजे होते. प्रदीप नगराळे म्हणाले, शिवाजी धर्मनिरपेक्ष राजे होते. अशरफ बेलीम म्हणाले, शिवाजी महाराजांची मुस्लीमविरोधी असल्याची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.डॉ. साबिहा खान म्हणाल्या, शिवाजी रयतेचे राजे होते. त्यांच्या सैन्यात ६६ हजार मुस्लीम सैनिक होते. ते खरे धर्मनिरपेक्ष होते. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, नरेंद्र जिचकार, जयेश तिमाने आदींनी विचार मांडले,पंकज निंबाळकर यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. दिलीप खोडके यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अरुणा भोंडे यांनी केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूर