शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

‘कॅन्सरला कॅन्सल’ करण्यासाठी एकत्रित लढ्याची गरज

By admin | Updated: April 27, 2017 01:45 IST

वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णासोबतच त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. कर्करोगाचे सर्वांत मोठे कारण तंबाखू आहे.

नागपूर : वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णासोबतच त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. कर्करोगाचे सर्वांत मोठे कारण तंबाखू आहे. म्हणूनच राज्यात त्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘कॅन्सरला कॅन्सल’ करायचे असेल तर एकत्रित लढ्याची गरज आहे. या रोगाच्या जनजागृतीसाठी ‘माऊथ पब्लिसिटी’ फार फायद्याची ठरू शकेल. म्हणूनच कर्करोगाविषयी आपण संवाद साधणे सुरू केल्यास याचा नक्कीच फायदा होईल, असे मत आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी येथे व्यक्त केले. ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या ब्रीदवाक्याला घेऊन ‘लोकमत’ आणि ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर’तर्फे आयोजित ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या १० दिवसांच्या उपक्रमाची सांगता बुधवारी नागपुरात झाली. त्या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर’च्या अध्यक्षा टीना अंबानी, प्रसिद्ध सिनेअभिनेते इमरान हाश्मी व ‘लोकमत’ समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक व नागपूर आदी ठिकाणी जाऊन कर्करोगाविषयी माहिती देऊन, लोकांशी संवाद साधत जनजागृती करण्यात आली. डॉ. दीपक सावंत म्हणाले, प्रसिद्ध सिनेअभिनेता इमरान हाश्मी हे आपल्या लोकप्रियतेचा वापर कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीमधून ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा फायदा रुग्णांसोबतच समाजाला होईल. नागपुरात केवळ विदर्भच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातून कर्करोगाचे रुग्ण येतात. त्यांच्या अद्ययावत उपचारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘टर्शरी कॅन्सर सेंटर’ सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी ४५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. याला गंभीरतेने घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषत: मुखकर्करोग व स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने आपल्या १० टक्के राखीव खाटा कर्करोगपीडित गरीब रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले. देशाने, राज्याने व समाजाने आम्हाला बरेचकाही दिले. कर्करोगाबाबत जागृती करणे यात प्रसिद्धीचा कुठलाही हव्यास नाही. समाजाने दिलेल्या प्रेमाच्या ऋणाची परतफेड करणे हेच सेवेमागील उद्दिष्ट आहे. ८० टक्के प्रकरणांत लवकर निदान झाले तर कर्करोगावर प्रभावी उपचार करणे शक्य असते. त्यामुळे जनजागृतीवर आम्ही भर देत आहोत, असे प्रतिपादन टीना अंबानी यांनी केले. कर्करोग म्हणजे अंत, असे होत नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि कुटुंबीयांचा आधार असल्यास अखेरच्या टप्प्यातील व्यक्तीदेखील ठणठणीत बरी होऊ शकते. कर्करोगाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करायला हवेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनावर भर देण्याची गरज आहे, असे मत इमरान हाश्मी यांनी व्यक्त केले. इमरान हाश्मी यांचा मुलगा अयान याला कर्करोग झाला होता. त्याच्या लढ्याविषयी त्यांनी भाष्य केले.या कार्यक्रमात कर्करोगाविषयी सविस्तर माहिती, त्यावरील अद्ययावत उपचार, नवे तंत्रज्ञान, गैरसमज व सध्याची स्थिती यावर वैद्यकीय तज्ज्ञ तसेच समाजसेवकांनी परिसंवादातून प्रकाश टाकला.‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र यांनी स्वागतपर भाषण केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार ‘कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल’चे सीईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी मानले. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) विशेष सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी लोकमतसमवेत अभियान : टीना अंबानीकर्करोग रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यातील ग्रामीण भागात १८ ‘कॅन्सर केअर सेंटर’ सुरू करण्याचे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने ठरविले होते. मागील वर्षी आॅगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याची घोषणादेखील करण्यात आली होती. अकोला, सोलापूर व गोंदिया येथील केंद्रांपासून ही सुरुवात झाली आहे. येथे रुग्णांच्या आरोग्य समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कर्करोगाबाबत जास्तीतजास्त प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी ‘लोकमत’समवेत आम्ही हे पाऊल उचलले. ‘लोकमत’च्या सहकार्याने राज्याच्या दुर्गम भागातदेखील कर्करोगाबाबत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे टीना अंबानी यांनी सांगितले.मी महाराष्ट्राची मुलगी...मी महाराष्ट्र राज्याची मुलगी आहे. महाराष्ट्रातच माझा जन्म झाला व या राज्याने मला सर्वकाही दिले. माझ्यावर झालेल्या संस्कारात व शिकवणीत महाराष्ट्राच्याच संस्कृतीचे प्रतिबिंब उमटले. याच राज्याच्या राजधानीत स्थापित केलेले कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल पश्चिम भारतातील सर्वांत चांगले रुग्णालय झाल्याचा अभिमान वाटतो.- टीना अंबानी, अध्यक्षा-कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरराज्यात तंबाखूबंदी हवीराज्यात तोंडाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याला तंबाखू हे मुख्य कारण आहे. त्यामुळे तंबाखूवर कायद्याने बंदी आणण्यासाठी राज्यात मी पुढाकार घेतो. केंद्रात विजय दर्डांनी प्रयत्न करावेत, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आवर्जून सांगितले.