शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्यासाठी निसर्गात कलाकृती शोधावी लागेल : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 23:49 IST

मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.

ठळक मुद्देमनोहर सप्रे यांना उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे यांनी कलेमध्ये समाजाची भागीदारी करून घेतली व तुटलेल्या फांद्यात कला शोधून जंगलाकडे नव्या दृष्टीने पाहणे शिकविले, असे गौरवोद्गार लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.वनराई फाऊंडेशन तसेच महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी द्वादशीवार बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, पोलीस महानिरीक्षक (अ‍ॅन्टी नक्षल स्क्वॉड) सुरेश शेलार, बी.के. सिंग, प्रकाश ठोंबरे, गोपाळराव ठोसर, वनराईचे गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी द्वादशीवार यांनी सप्रे यांचा कलात्मक परिचय करून दिला. हा सत्कार व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार किंवा कलाकाराचा नाही तर विद्वानाचा आहे. व्यंगचित्रकार म्हणून लोकांचे अंतर्मन वाचणाची कुवत त्यांच्यात आहे. त्यांनी झाडापासून तुटून पडलेल्या निराकार लाकडांमध्ये कलात्मक आकार शोधला व तो पाहण्याची दृष्टी दिली. ही कला इतकी वर्षे निष्ठेने जपली आणि तरुणांपर्यंत पोहचविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषणावरही चिंता व्यक्त केली. प्रदूषण रोखण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागणार आहे. तीन वर्षात ५० वाघ आणि २६३ बिबटे मारले गेले. हे रुबाबदार प्राणी कसे जगतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वनखात्याच्या धोरणात मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे आवाहन द्वादशीवार यांनी केले.यावेळी नितीन काकोडकर यांनी मनोहर सप्रे यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. २० वर्षापूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी २००० सालापर्यंत वाघ नाहिसे होतील, असे भाकीत केले होते. मात्र असे झाले नाही. उलट वाघांची संख्या वाढल्याचे सांगत यासाठी वनविभागाला श्रेय द्यायला हवे, असे मनोगत मांडले. वाघांची वाढ आणि त्यांचे मृत्यू हे निसर्गाचे चक्र असल्याचेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देत मनोगत मांडताना मनोहर सप्रे यांनी निसर्गाशी चाललेल्या मानवी स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली.आपण निसर्गापासून पूर्णपणे तुटलो आहोत व शहरी लोकांना दररोज ही शोकांतिका सोसावी लागते. मानव प्राण्याला जगण्यासाठी निसर्गाजवळ सर्व काही आहे, पण माणूसच अतृप्त आहे. नैसर्गिक साधनांचा बेमालूम वापर, जमेल तेवढी लूट केली जात आहे. माणसांचा चंगळवाद हा व्यसनाप्रमाणे झाला असून त्यातून बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. न्यूनतम साधनातून महत्तम आनंद कसा घ्यावा, हे आदिमानव किंवा बालकांकडून शिकता येते. वडीलधारे मात्र या बालकांना निसर्गापासून तोडत असल्याची खंत त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन वनराईचे विश्वस्त अजय पाटील यांनी केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर