शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नागपूरच्या केळीबाग रोडसाठी १३७.४१ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:20 IST

महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे.

ठळक मुद्देजमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युत वाहिनीच्या स्थलांतराचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे.केळीबाग रोड २४ मीटर रुंदीचा केला जाणार आहे. परंतु यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. रोडच्या कामासाठी महापालिकेच्या मालकीच्या इमारती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सोबतच दुकाने व निवासी इमारती हटविण्याची गरज आहे. प्रकल्पग्रस्तांनी मोबदला म्हणून रोख रकमेची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेपुढे या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सी.पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज यादरम्यानच्या १०३० मीटर लांबीच्या प्रकल्पावर येणारा खर्च महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिका २९ सप्टेंबरच्या विशेष सभेत याबाबतचा प्रस्ताव पारित करून राज्य सरकाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे.केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या अधिग्रहणावर ११६ कोटी ८१ लाख खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. जलवाहिनी स्थलांतरणावर तीन कोटी आठ हजार, विद्युतवाहिन्या दुसरीकडे हलविण्यासाठी २ कोटी २५ लाख तसेच स्थापत्य व अन्य बाबींवर जीएसटीसह १५ कोटी २७ लाखांचा खर्च होईल. नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिका राज्य सरकारकडे १२२ कोटी १४ लाखांच्या निधीची मागणी करणार आहे. विशेष म्हणजे रोड रुंदीकरणासाठी महापालिकेने हटविलेल्या दुकानदारांचा पुनर्वसन प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. दुकानदारांनी पर्यायी जागेची मागणी केली आहे.आॅरेंज सिटीसाठी महामेट्रो २.५ टक्के रक्कम घेणारवर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफ पर्यंतच्या ३०.४९ हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येणारा आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विशेष सभेत मांडला जाणार आहे. या प्रकल्पावर खर्च होणाऱ्या एकूण रकमेच्या २.५ टक्के रक्कम महामेट्रो देणार आहे. २१ प्लाटपैकी प्रथम क्रमांकाच्या प्लाटवर मॉल उभारण्यात येणार आहे. याबाबतचा करार करण्याची तयारी करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार आॅरेंज सिटी स्ट्रीटचे काम महामेट्रोला निर्णय घेतला आहे.सहापदरी मार्गासाठी रेल्वे स्टेशनचे पश्चिम गेट तोडणाररेल्वे स्टेशनच्या पश्चिम गेट समोरील उड्डाण पूल तोडणे, यामुळे बाधित होणाऱ्या १७५ दुकानदारांचे पुनर्वसन व सहापदरी मार्गाचे निर्माण याबाबत महामेट्रो व महापालिका यांच्यात करार होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विशेष सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. सीआरएफ निधीतून या प्रकल्पासाठी २३४ कोटी २१ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सन २००८ साली १६ कोटी २३ लाख खर्च करून रेल्वे स्टेशन समोर १०.५ मीटर रुंद व ८१२ मीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्यात आला होता. येथे १७५ दुकान गाळे व सुलभ शौचालय उभारण्यात आले. रामझुल्याच्या दुसºया टप्प्याच्या बांधकामात बाधा निर्माण होणार असल्याने हा उड्डाणपूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhighwayमहामार्ग