शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एनडीडीबीचे विदर्भ मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलनाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:49 IST

राष्ट्रीय  डेअरी विकास बोर्डातर्फे (एनडीडीबी) विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती एनडीडीबीचे चेअरमन डॉ. दिलीप रथ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे डॉ. दिलीप रथ : शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय  डेअरी विकास बोर्डातर्फे (एनडीडीबी) विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती एनडीडीबीचे चेअरमन डॉ. दिलीप रथ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.कविवर्य सुरेश भट सभागृहात शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी जुळलेल्या मुद्दांवर २१ एप्रिलला सकाळी १० वाजता आयोजित प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले आहेत. या कार्र्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.रथ म्हणाले, आजच्या तारखेपर्यंत एनडीडीबीचा सहायक उपक्रम मदर डेअरीने विदर्भाच्या अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात तसेच मराठवाड्याच्या नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून दोन लाख लिटर दूध संकलनाला सुरूवात केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून दररोज ४९ हजार लिटर दूध संकलित करण्यात येते. १४०० गावातील २७ हजार शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन होते. भविष्यात मदर डेअरीचे ७९ तहसीलांमधून दूध संकलनाचे नियोजन आहे. सध्या ५९ तहसीलातून दूधाचे संकलन होते. या व्यापक अभियानाचा परिणाम असा झाला की, मदर डेअरी स्थानिक शेतकऱ्यांना दर महिन्याला २० कोटींची उपजीविका प्रदान करण्यात यशस्वी ठरली आहे. या अभियानाने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील डेअरी शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नाला सोडविले आहे. त्यांना नियमित मिळकत व्हावी, असा या मागील हेतू आहे.पत्रपरिषदेत एनडीडीबीचे कार्यकारी संचालक वाय.वाय. पाटील, महाव्यवस्थापक चेतन शर्मा. क्षेत्रीय प्रमुख (पश्चिम क्षेत्र) अनिल हातेकर उपस्थित होते.

टॅग्स :milkदूधnagpurनागपूर