शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:19 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही रेशीमबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देरेशीमबाग चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही रेशीमबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पडळकरांचा निषेध करीत निदर्शने करण्यात आली.भाजपने पडळकरांच्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. कोतवाली पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, शहर कार्याध्यक्ष जावेद हबीब, गटनेते नगरसेवक दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, डॉ. विलास मूर्ती, दिनकर वानखेडे, धर्मेंद्र खमेले, अशोक काटले, अविनाश शेरेकर, मिलिंद मानापुरे, रवी इटकेलवार, मेहबूब खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.पडळकरांचे वक्तव्य निषेधार्ह : सलील देशमुखभाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य केवळ निषेधार्ह नव्हे तर हीन पातळीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी व्यक्त केले. परावलंबी आमदार पडळकर यांनी स्वयंभू नेते शरद पवार यांच्यावर बोलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.आमदार पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार यांचे योगदान सगळ्या देशाला माहिती आहे. पडळकर सध्या भाजपच्या खांद्यावर बसून राजकारण करीत आहेत. शरद पवार हे स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्र व देशाच्या विकासाला दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही. याची जाणीव आमदार पडळकर यांनी ठेवावी, असेही सलील देशमुख यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन