शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 11:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.

नागपूर : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. यातच, बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा हा मार्ग आहे, त्यामुळे बंडखोरांना त्यासाठी परत यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले होते. यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या धमकीवजा वक्तव्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नागपुरात निषेध नोंदवला आहे. 

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली होती. यानंतर, एकच खळबळ उडाली. याचे पडसाद नागपुरातही उमटले. 

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दुनेश्वरजी पेठे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक गांधी पुतळा सीताबर्डी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. राणे यांना अटक करण्याबाबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनरवरील फोटोवर संताप व्यक्त केला. तसेच राणे यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूरSharad Pawarशरद पवारNarayan Raneनारायण राणे