शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीएलटी’ने संचालक मंडळाला अधिकार केले बहाल

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 23, 2024 20:54 IST

- चेंबरचे अध्यक्ष मेहाडिया, सचिव तोतला यांचा राजीनामा : नवीन अध्यक्षांची निवड होणार, सप्टेंबर-२५ पर्यंत कार्यकाळ

नागपूर : राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सवर असलेली प्रशासकाची नियुक्ती अवैध ठरवत व्यापाऱ्यांची कार्यकारिणी पूर्ववत राहणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाचे सदस्य प्रभात कुमार (तांंत्रिक) आणि सदस्य (न्यायिक) व्ही.जी. बिष्ट यांनी २ एप्रिलला दिला. त्यानंतर संचालक मंडळाने चेंबरचा कार्यभार स्वीकारला. मात्र नैतिकतेच्या आधारावर मंडळाचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि सचिव रामअवतार तोतला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

मेहाडिया आणि तोतला यांच्या राजीनाम्यानंतर नवीन अध्यक्ष व सचिवांची नियुक्त होईपर्यंत चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांच्याकडे चेंबरची जबाबदारी आली आहे. चेंबरचा कार्यकाळ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक होणार नाही. निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार एनसीएलटीने आम्हाला बहाल केल्याचे चेंबरच्या कार्यकारिणीचे मत आहे. सर्वसंमतीने चेंबरचे अध्यक्ष आणि सचिवांची निवड होणार असल्याची माहिती आहे.

चेंबरचा कार्यकाळ नेहमीच विवादास्पद राहिला. चेंबरच्या माजी अध्यक्षांनी एकत्रितरीत्या चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि त्यांच्या कार्यकारिणीवर मनमानी कारभार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप लावले आणि सखोल चौकशीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. चेंबरच्या कार्यकारिणीवर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत एनसीएलटीने ३१ जानेवारी २०२३ रोजी प्रशासक यू.एन. नाहटा यांची नियुक्ती केली होती. मात्र, २ एप्रिल २०२४ च्या निर्णयाने चेंबरच्या आधीच्या कार्यकारिणीला सर्व अधिकार बहाल झाले. त्यानंतर चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी चेंबरचा कार्यभार स्वीकारला होता. 

प्रशासकाच्या १४ महिन्याच्या काळात चेंबरचा ५० लाखांहून खर्च झाला. या खर्चाची जबाबदारी कार्यकारिणीने स्वीकारून अध्यक्षांनी ५० लाखांचा भरणा स्वत:च्या खिशातून करावा, अशी मागणी चेंबरच्या माजी अध्यक्षांची आहे.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा ()‘एनसीएलटी’ने कार्यकारिणीच्या बाजूने निर्णय दिल्याने सर्व व्यापारी आणि सत्याचा विजय झाला. चेंबरमध्ये आर्थिक अनियमितता झालीच नाही. खरी बाजू एनसीएलटीच्या निर्णयाने पुढे आली. चेंबरचा कार्यभार स्वीकारला. पुढे झंझट नको म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. व्यापाऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत राहू.अश्विन मेहाडिया, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत ()‘एनसीएलटी’ने कार्यकारिणीला चेंबरमध्ये बसविले, पण निर्णय घेण्याचे अधिकार शून्य आहेत. पदाधिकारी केवळ कर्मचाऱ्यांचे पगार करू शकतील. चेंबरला नवीन अध्यक्षांची निवड करता येणार नाही. ही निवड सर्वसंमतीनेच होईल. ‘एनसीएलटी’ निर्णय घेईल. आम्ही केलेल्या आरोपातून अध्यक्षांची अद्यापही सुटका झालेली नाही.डॉ. दीपेन अग्रवाल, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

टॅग्स :nagpurनागपूर