शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:55 IST

यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन  होणार असून ग. दि. माडगूळकर यांच्यावरील विशेष कार्यक्रमासह परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, ग्रंथ प्रकाशन, ललित गद्यानुभव व सांस्कृतिक कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी भाषाप्रेमींना मिळणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ येथे जय्यत तयारी सुरू : तीन दिवस भरगच्च साहित्यिक मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन  होणार असून ग. दि. माडगूळकर यांच्यावरील विशेष कार्यक्रमासह परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, ग्रंथ प्रकाशन, ललित गद्यानुभव व सांस्कृतिक कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी भाषाप्रेमींना मिळणार आहे.यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे होणाऱ्या संमेलन स्थळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा यांच्या संयुक्तवतीने हे संमेलन होत आहे. ११ जानेवारीला दुपारी ४ वाजता नयनतारा सहगल या संमेलनाचे उद्घाटन  करतील. नयनतारा या भारताच्या पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत. उद्घाटन  सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्यासह पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांची प्रमुख उपस्थिती राहील. सुरुवातीला सकाळी ९.३० वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून त्यानंतर लगेच मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या जागेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस विविध व्यासपीठावर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.शनिवारी १२ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. विद्या बाळ, भ. मा. परसवाळे यांचा सत्कार केला जाणार आहे. रविवारी १३ रोजी दुपारी १.१५ वाजता प्रतिभावंतांच्या सहवासात कार्यक्रम डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुळकर्णी व डॉ. राणी बंग यांना भेटता येईल. दुपारी २.३० वाजता प्रकट मुलाखत सदरात डॉ. प्रभा गणोरकर यांची मंगेश काळे व डॉ. कविता मुरुमकर मुलाखत घेतील. दुसºया व्यासपीठावर दुपारी १.४५ वाजता 'कथा आणि व्यथा: तांड्यांच्या आणि पोडांच्या' हा कार्यक्रम होईल.दुपारी ४.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोप समारंभ होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी ठराव वाचन केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता आकाशवाणी यवतमाळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.ग्रंथदिंडीचे आकर्षणसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैदानावरून ग्रंथदिंडी निघणार असून २ किलोमीटर मार्गावरील या ग्रंथदिंडीत शेतकऱ्यांची बैलबंडी, गुरुकुंज मोझरीचे बाल भजन मंडळ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चित्र, कलशधारी मुली, अनेक संतांच्या वेशातील मुले-मुली असतील. बंजारा, तीज, लेंगी, आदिवासी लोकनृत्य पथक, दंडार पथक, लेझीम पथक, साहित्यिकांचे दर्शन अशा विविध बाबींचा समावेश असेल.कविकट्टा, कुवसंमेलन, कवितावाचन११ तारखेला सायंकाळी कविकट्टाचे उद्घाटन डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलन होईल. १२ तारखेला सायंकाळी ५ वाजता मीरा ठाकरे यांच्या अध्यक्षतेत वऱ्हाडी बोली कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता विदर्भ व मराठवाड्यातील नामवंत कवींच्या कवितांचा कार्यक्रम व १३ ला सकाळी ९.३० वाजता मान्यवर कवींचे कवितावाचन होणार आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ