शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक संत्रा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:53 IST

लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत अधिकाऱ्यांसह संत्रा उत्पादक संघ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनामती येथे आयोजित बैठकीत अधिकारी व संत्रा उत्पादकांमध्ये चर्चा झाली आणि संत्रा महोत्सवाबाबत अनेक महत्त्वाच्या सूचनाही आल्या.

ठळक मुद्देअधिकारी-उत्पादकांमध्ये उत्साह : बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत अधिकाऱ्यांसह संत्रा उत्पादक संघ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनामती येथे आयोजित बैठकीत अधिकारी व संत्रा उत्पादकांमध्ये चर्चा झाली आणि संत्रा महोत्सवाबाबत अनेक महत्त्वाच्या सूचनाही आल्या.जागतिक संत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अप्पर आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी वनामती येथे कृषी अधिकारी आणि संत्रा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, नागपूर संत्रा, फ्रुट, फ्लॉवर, व्हेजिटेबल उत्पादन सहकारी संस्था काटोलचे सचिव आणि ऑर्गेनिक शेतीचे पुरस्कर्ते मनोज जवंजाळ, सुधीर जगताप, मिलिंद राऊत, रणजित चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.१८ ते २१ जानेवारी दरम्यान नागपुरतील रेशिमबाग मैदानावर जागतिक संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा शासन व प्रशासन यात पूर्णपणे सहभगी आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सर्व कृषी विभागासह सर्व विभागांना या महोत्सवाच्या तयारीसंदंर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. याअंतर्गत कृषी विभागातर्फे संत्रा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक वनामती येथे पार पडली. यात चांगली चर्चा झाली. अनेकांनी आपले विचार मांडले. संत्रा महोत्सवात देश विदेशातील तज्ञांचे मार्गदर्शन होईल. भव्य प्रदर्शन राहील. मनोरंजनासह प्रबोधनही होईल. एकूणच संत्र्याचे जास्तीत जास्त मार्केटिंग करून तो लोकांपर्यंत जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती केली जाईल. शेतकऱ्यांना महोत्सवापर्यंत आणले जाईल, असा प्रयत्न करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. लोकमतचे आतिष वानखेडे यांनी संत्रा महोत्सवाचे प्रेझेंटेशन सादर केले.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी