शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव अटकेत : कामठीत रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 22:09 IST

Child marriage बोहल्यावर चढण्यापूर्वीच बालविवाह करणाऱ्या नवरदेवाला अटक करण्यात आली. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत छावणी परिसरात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व ठाणेदार विजय मालचे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा विवाह रोखण्यात आला.

ठळक मुद्देवधूच्या आईची पोलिसांत तक्रार

 लोकमत न्यूज नेटवर्क

कामठी: बोहल्यावर चढण्यापूर्वीच बालविवाह करणाऱ्या नवरदेवाला अटक करण्यात आली. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत छावणी परिसरात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व ठाणेदार विजय मालचे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा विवाह रोखण्यात आला.नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना मिळाली. त्यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सचिन जाधव यांना याबाबत अवगत केले. यानंतर मुश्ताक पठाण, ठाणेदार विजय मालचे पोलीस पथकासह विवाह मंडपात पोहोचले. वर-वधूच्या पालकांना वधू-वरांच्या जन्माच्या दाखल्याबाबत विचारणा केली. तीत मुलीचे वय १७ तर मुलाचे वय १९ इतके दिसून आले. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखला. यासोबतच वर-वधूच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर वर-वधूच्या पालकाकडून लग्न न करण्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात आले. यानंतर वधूच्या आईने पोलीस ठाण्यात नवरदेव शैलेश संतोष राऊत (१९, रा. रामगड, कामठी) याने आपल्या अल्पवयीन मुलीवर प्रेमजाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करून शैलेश राऊत यास अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, नायब तहसीलदार आर. टी. ऊके, दक्षता समितीचे सदस्य शीतल चौधरी, संध्या रायबोले, सुषमा सहारे, अंगणवाडी सेविका रुक्मिणी जांगीडवार यांच्या पथकाने केली.

टॅग्स :marriageलग्नArrestअटक