शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

नाट्य परिषद निवडणूक : 'मध्यवर्ती'च्या मैदानात प्रस्थापितांचाच झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:23 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली.

ठळक मुद्देचनाखेकर, शेख यांनीही मिळवली लक्षवेधी मते

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्रमाणे झाली. यंदा पहिल्यांदाच नागपुरातील रंगकर्मी गुप्त मतदान करणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे शहरातील नाट्य विश्वाचे लक्ष लागले होते. रंगकर्मीचे प्रतिनिधित्व करणाºया महानगर व नागपूर अशा दोन्ही शाखांचे सदस्य मैदानात होते. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चनाखेकर, सलीम शेख तर नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी यांच्याशिवाय दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर हे स्वतंत्र उमेदवारसुद्धा मध्यवर्तीत जाण्यास उत्सुक होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी विजयी झाले आहेत. गडेकर यांना दोन्ही फेºयाअंती ४०१, बेंद्रे यांना ३६९ तर भुसारी यांना ४१२ इतकी मते मिळाली. सलीम शेख यांना १७६ तर चनाखेकर यांना २०३ मते मिळाली. या दोघांचा मतांचा आकडा बराच बोलका आहे. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना अनुक्रमे १११ व २८ मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ७ मार्च रोजी मुंबईच्या केंद्रीय कार्यालयात होणार आहे.

टॅग्स :marathaमराठाElectionनिवडणूक