शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादीची टीक टीक बंद !

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमी ‘दहा वाजून दहा मिनिटे’ झालेली दिसतात. हाच दहाचा आकडा नागपुरातही राष्ट्रवादीला चिपकला आहे. जिल्ह्यातील १२ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे

दहा जागांवर डिपॉझिट जप्त : आजी- माजी मंत्रीही पराभूतनागपूर : राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमी ‘दहा वाजून दहा मिनिटे’ झालेली दिसतात. हाच दहाचा आकडा नागपुरातही राष्ट्रवादीला चिपकला आहे. जिल्ह्यातील १२ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’(अनामत) जप्त झाले आहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारमध्ये रोहयो मंत्री राहिलेले अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग या दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने राष्ट्रवादीची टीकटीक बंद झाली आहे. काँग्रेस सोबत आघाडीचे जागावाटप करताना नागपूर शहरात तीन व ग्रामीणमध्ये तीन अशा किमान सहा जागा मिळाव्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मागणी होती. या जागा मिळाल्या तर आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास वेळोवेळी पक्षनेतृत्वाला दिला जात होता. शेवटी आघाडी तुटली व सहाऐवजी पूर्ण १२ जागांवर लढण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली. मात्र, या संधीने राष्ट्रवादीचे पितळ उघडे पाडले. एकही जागा निवडून आणता आली नाही. काटोलमध्ये अनिल देशमुख ५ हजार ५५७ मतांनी पराभूत झाले तर हिंगण्यात रमेश बंग यांना २३ हजार १५८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत बंग हे काठावर हरले होते, तर देशमुख हे एकतर्फी विजयी झाले होते. मात्र, या वेळी दोन्ही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी नगरसेविका प्रगती पाटील पश्चिम नागपुरातून रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना जेमतेम ४ हजार ३१ मते मिळाली. काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे आमदार दीनानाथ पडोळे हे दक्षिण नागपुरात राष्ट्रवादीकडून लढले. मात्र, ४ हजार १९४ मतांसह ते सहाव्या क्रमाकांवर घसरले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल यांना रामटेकमध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले. मात्र, ९ हजार ११६ मते घेत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल खांडेकर यांना उत्तर नागपुरात फक्त ७७६ मते मिळाली. उमरेडमध्ये रमेश फुले यांना २ हजार ७४७ मते, सावनेरमध्ये किशोर चौधरी यांना ६ हजार १३९ मते तर कामठीत महेंद्र लोधी यांना फक्त ७५२ मते मिळाली. राष्ट्रवादीचा हा परफॉर्मन्स नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. (प्रतिनिधी)