शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:51 IST

देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

ठळक मुद्देयुवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.रोहित कुमार सिंह म्हणाले, राष्ट्रीय युवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातही युवा आयोग तयार व्हायला हवेत; सोबतच बेरोजगारांना कमीतकमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करावयास हवा. तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात सूत्र असावे असेयुवकांबाबतचे धोरण तयार व्हावयास हवे. सध्या देशात बहुतांश राज्यात बेरोजगारी भत्ता देण्यात येत नाही. अशास्थितीत केंद्र सरकारतर्फे हा भत्ता ठरवून राज्य शासनाने त्यावर अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे. त्यांनी राजकारणात वाढत्या घराणेशाही विरुद्ध आवाज बुलंद करण्यावर भर दिला. ते म्हणाले, राजकीय घराणेशाहीत सर्व राजकीय पक्ष सामील आहेत. यामुळे सर्व देश पीडित आहे. या घराणेशाही विरुद्ध युवा चेतना संघटना वातावरण तयार करीत आहे. देशाच्या सध्याच्या स्थितीसाठी त्यांनी आधीचे शासन जबाबदार असल्याचे सांगितले.सरकारी शाळात शिकावीत नेत्यांची मुलेरोहित कुमार सिंह म्हणाले, मागील काही वर्षांत सरकारी शाळांबाबतचे आकर्षण कमी झाले आहे. या शाळा गरिबांच्या मुलांसाठी आहेत, अशी धारणा झाली आहे. ही धारणा बदलविण्यासाठी शासनात सहभागी नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकविण्यासाठी सुरुवात करावी लागेल. देशातील बेरोजगारीसाठी सध्याचे शैक्षणिक धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वेतनासाठी एकजूट होणाऱ्या देशातील नेत्यांनी चांगले शैक्षणिक धोरण, युवकांबाबतचे धोरण तयार करण्यावर भर द्यावयास हवा. शिक्षणाचे भारतीयकरण होणे गरजेचे आहे.१५ राज्यांत काम करीत आहे युवा चेतनारोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, सध्या युवा चेतना संघटना देशातील १५ राज्यांत राष्ट्रीय विचारधारेसाठी काम करीत आहे. महाराष्ट्रात लवकरच संघटनेचे काम सुरू होणार आहे. संघटनेचे मुख्य कार्यालय दिल्लीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरLokmat Bhavanलोकमत भवन