शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:25 IST

रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले.

ठळक मुद्देआढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले.रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी नागपुरात बैठक झाली. तीत विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी या खात्याचे मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय राजमार्ग विभाग मुंबईचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, नागपूरचे अधीक्षक अभियंता बी.डी. ठेंग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर, महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल तसेच विदर्भातील विविध विभागाचे अधिकारी व रस्ते कंत्राटदार उपस्थित होते.बैठकीत रस्तानिहाय आढावा घेण्यात आला. कोणत्या रस्त्याचे काम कुठपर्यंत झाले आहे, त्यात काय अडचणी येत आहेत. कोणत्या रस्त्याचे काम थांबले आहे आहे, याची माहिती घेत अडथळे त्वरित दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. वनविभागाच्या परवानगीसाठी अडलेली रस्त्यांची कामे त्वरित कशी सुरू करता येतील यासाठी वनविभागाशी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार महामार्गावर बांधण्यात येणाऱ्या पुलांचे बांधकाम करताना तेथे बांध बांधण्याचीही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे जलसंचयनास मदत होणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर