शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना येणार गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:31 IST

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना गोत्यात येणार कारण सरकारजवळ या विमा योजनेचे प्रीमियम भरण्यासाठी पुरेसा पैसाच नाही, असे भाकीत अ‍ॅक्चुअरीजने केले आहे.

ठळक मुद्देप्रीमियमसाठी पुरेशी रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना गोत्यात येणार कारण सरकारजवळ या विमा योजनेचे प्रीमियम भरण्यासाठी पुरेसा पैसाच नाही, असे भाकीत अ‍ॅक्चुअरीजने केले आहे.राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजनेत वित्तमंत्र्यांनी दरवर्षी १० कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयाचे स्वास्थ्य विमा संरक्षण सरकार देणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारी मालकीच्या चार जनरल इन्शुरन्स कंपन्या म्हणजे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांमार्फत हे विमा संरक्षण देण्याची सरकारची योजना आहे.

प्रीमियमसाठी पैसे नाहीतया योजनेबद्दल चौकशी केली असता एका प्रख्यात अ‍ॅक्चुअरीने गोपनीयतेच्या अटीवर प्रीमियमचा हिशेबच मांडला. या अ‍ॅक्चुअरीजच्या मते पाच लाख विमा संरक्षण देण्यासाठी विमा कंपन्यांना साधारणत: ५००० रुपये प्रीमियम आकारावे लागते. १० कोटी कुटुंबांना असे संरक्षण पुरविण्यासाठी सरकारला विमा कंपन्यांना प्रीमियमपोटी दरवर्षी पाच लाख कोटी रुपये द्यावे लागतील. सरकारचा पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प २४.४२ लाख कोटी रुपयांचा आहे. त्यातून पाच लाख कोटी निघणे अशक्य आहे. त्यामुळे ही योजना असफल होणार हे स्पष्ट आहे, असे मत या अ‍ॅक्चुअरीने व्यक्त केले.

अ‍ॅक्चुअरीज काय करतातअ‍ॅक्चुअरियल सायन्स हे संख्याशास्त्र व शक्यतेच्या सिद्धांतावर आधारित एक शास्त्र आहे. त्यात पारंगत असणाऱ्या व्यक्तींना अ‍ॅक्चुअरीज म्हणतात. अ‍ॅक्चुअरीज विमा कंपन्यांसाठी जोखमीची शक्यता लक्षात घेऊन विमा पॉलिसीचे प्रीमियम निश्चित करतात. यासाठी व्यक्तीचे वय, त्याला होऊ शकणारा आजार, शारीरिक स्थिती इत्यादी बऱ्याच मुद्यांचा विचार करून हे प्रीमियम अ‍ॅक्चुअरीज ठरवतात. भारतात इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅक्चुअरीज इंडिया ही नवी मुंबईतील संस्था या शास्त्राचे शिक्षण देते.

टॅग्स :Healthआरोग्य