शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 14:45 IST

बनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देशातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देबनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देशातील विविध ठिकाणच्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देशातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या घडामोडीमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नामांकित कंपन्या, संस्थांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळते. त्यामुळे आपल्याकडील अधिकारी असल्याचे सांगून ठगबाजांनी कागदांवर बनावट कंपन्या उभ्या केल्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे अनेकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठविले. २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येत अशा बोगस विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात हरियाणा, बिहार, राजस्थानसह अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दरम्यान, या गैरप्रकाराची सरकारकडे तक्रार झाल्यानंतर गोपनीय चौकशी सुरू झाली. त्यात तथ्य आढळल्याने संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयातून १४ मे २०१९ ला राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय प्रशासनाला निर्देश मिळाले. त्यावरून महाविद्यालयातर्फे गुरूदेवसिंग दलजीतसिंग सैनी (वय ५९) यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली.महाविद्यालय, शासन आणि संस्थांची फसवणूक करणारांमध्ये आरोपी अनिलकुमार (रा. नायगाव, जि. झांझर, बहादूरगंज, हरियाणा), जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सहारता (बिहार), पोशी हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्यपुरा (बिहार), नॅशनल शुगर अ‍ॅण्ड केमिकल्स लि. कटिहार (बिहार), भारत हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लि. कटेहार (बिहार), हिंदुस्तान इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इक्विपमेंट लि. पूर्णिया (बिहार) टेकनेक कॉम्बो मेन्टेनन्स लि. कटिहार (जि. बिहार) आणि पॅसिफिक इंडिया प्रा. लि. अलवर (राजस्थान) यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून मानकापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी अपेक्षित असल्याचे मानकापूरपोलीस सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी