शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ आॅगस्टला मुंबईत महाअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:46 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आॅगस्टला मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब आॅफ इंडिया डोम येथे आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देओबीसी समाजाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करा यासह २४ मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आॅगस्टला मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब आॅफ इंडिया डोम येथे आयोजित करण्यात आले आहे.यात ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करून केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. मंडल आयोग नच्चीपन समिती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, ओबीसी घटकातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करण्यात यावा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, तहसीलपासून न्यायिक स्तरावरील भरतीत आरक्षण लागू करावे, ओबीसी समाजाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करण्यात यावा यासह विविध प्रकारच्या २४ मागण्यांसाठी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा देशातील ओबीसी समाजासाठी कार्यरत असणाºया विविध ओबीसी संघटनांचा एक महासंघ आहे. या महासंघाचे पहिले अधिवेशन नागपुरात ७ आॅगस्ट २०१६ रोजी झाले होते. या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला नॉन क्रिमिलेअरची मर्यादा साडेचार लाखाहून सहा लाख करण्याचा निर्णय घ्यावा लागला होेता. ८ डिसेंबर २०१६ रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर एक लाखापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात आला होता. परिणामी महाराष्ट्र सरकारला ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी लागली. ८ आॅगस्ट २०१७ च्या महाअधिव्ोशनानंतर नॉन क्रिमिलेअरची मर्यादा ८ लाख करण्यात आली. देशातील सर्व ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणाचे हे फलित आहे. तसेच केंद्र सरकारने नागपुरात ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार असून यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी दिली. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर