शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अभियंता दिवस; अभियंत्यांना घडविणारे अनोखे द्रोणाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:17 IST

आजच्या युगात अभियंते ‘पॅकेज’च्या मागे धावत असताना उपराजधानीत स्थापत्य अभियांत्रिकीतील एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील अध्यापन अन् संशोधनाचा वसा सोडलेला नाही.

ठळक मुद्देवयाच्या ८३ व्या वर्षीही संशोधन साधना स्थापत्य अभियांत्रिकीतील ठरणार पहिले ‘डीएसस्सी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियंता म्हणजे केवळ काही पुस्तके वाचून मिळविलेल्या पदवीतून निर्माण झालेले पद नाही. देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचा मौलिक वाटा असतो. मात्र अभियंता झाल्यानंतर आपली जबाबदारी ओळखून स्वत:ला झोकून देणे अन् अक्षरश: साधना करणे याला वेगळीच जिद्द लागते. आजच्या युगात अभियंते ‘पॅकेज’च्या मागे धावत असताना उपराजधानीत स्थापत्य अभियांत्रिकीतील एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील अध्यापन अन् संशोधनाचा वसा सोडलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे संशोधन साधना करत असताना त्यांच्यातील विद्यार्थीवृत्ती आजही कायम आहे. हजारो विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून घडविणारे डॉ.आनंद भोळे यांचा तरुण अभियंत्यांनी नक्कीच आदर्श घेतला पाहिजे.नागपूरचेच रहिवासी असलेल्या डॉ. आनंद भोळे यांनी जबलपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९५६ साली पर्यावरण विज्ञान या विषयात ‘रुडकी’ येथून ‘एमई’ केले. त्यांनी लंडन विद्यापीठात ‘पीएचडी’ पदवी मिळविली. यासाठी त्यांना ‘युनेस्को’ची ‘फेलोशीप’देखील मिळाली होती. १९६१ मध्ये ‘व्हीआरसीई’मध्ये (आताचे ‘व्हीएनआयटी’) ते प्राध्यापकपदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला संशोधनाला वाहून घेतले व सुमारे २५० तांत्रिक शोधपत्रिका प्रकाशित केल्या.त्यांच्या नावावर १२ पेटंट्सची नोंदणी असून त्यांच्या मार्गदर्शनात २५ विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली. विद्यापीठातदेखील अभ्यास मंडळ, ‘आरआरसी’ इत्यादी प्राधिकरणांवर ते कार्यरत होते. डॉ.

भोळे यांनी आपल्या संशोधनातून ‘इलेक्ट्रीकल’ आणि ‘मेकॅनिकल’ या संकल्पनांचा उपयोग न करता भूजल शुद्ध करण्याचे संशोधन केले व त्यात त्यांना यशदेखील आले. स्थापत्त्य अभियांत्रिकीमध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.आपल्या संशोधन वृत्तीमुळे ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. ‘सिम्पल अ‍ॅन्ड लो कॉस्ट वॉटर ट्रीटमेन्ट टेक्नॉलॉजी फॉर रुरल एरिया’ या विषयावर त्यांनी संशोधन सादर केले. त्यांचे ‘पेटन्ट्स’ व विविध शोधपत्रिका याच्यावर हे संशोधन आधारित होते. नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ त्यांना ‘डीएसस्सी’ (डॉक्टर आॅफ सायन्स) ही पदवी प्रदान करणार आहे.

आजही सुरू अध्यापनाचे कार्यसाधारणत: साठीनंतर लोक निवृत्तीचे जीवन जगणे पसंत करतात. मात्र डॉ. भोळे यांनी साठीनंतर नव्या जोमाने संशोधन व अध्यापन कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. आज ८३ व्या वर्षीदेखील ते शहरातील एका महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहेत. डॉ. आनंद भोळे यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ओळख आहे. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’तर्फे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयावरील प्रारुप तयार करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते हे विशेष.

तरुणांनी पैशाच्या मागे धावू नयेअभियंता दिन हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा दिवस आहे. आजचे विद्यार्थी पदवी मिळाल्यानंतर थेट मोठ्या ‘पॅकेज’च्या नोकरीची अपेक्षा करतात. मात्र विद्यार्थ्यांनी पैशाच्या मागे न धावता अध्यापन, उच्चशिक्षण व संशोधन यावर भर देण्याची गरज आहे. यातूनच देशाचे भविष्य घडणार आहे. भविष्यातील अभियंते घडविण्याची जबाबदारी आजच्या हुशार विद्यार्थ्यांवर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे मत डॉ. भोळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र