नागपूर : २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन राहणार असून २४ वर्षांनंतर नागपुरात याचे आयोजन होत आहे. देशभरातून सुमारे ४ हजार स्थानाहून लाखो विद्यार्थी व कार्यकर्ते व्हर्च्युअल माध्यमातून यात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी.लक्ष्मण यांनी दिली.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अधिवेशन स्वागत समिती सचिव समय बन्सोड, व्यवस्था प्रमुख भागवत भांगे व महानगर मंत्री करण खंडाळे उपस्थित होते