शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स’ २०२१ मध्ये सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 20:45 IST

जनसंवादाच्या पद्धती व तंत्रामध्ये मागील काळापासून कमालीचा बदल दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने मुंबईच्या ‘फिल्मसिटी’जवळ ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अ‍ॅन्ड कॉमिक्स’ सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. यासंदर्भातील काम सुरू असून येथील ‘कॅम्पस’ २०२१ मध्ये सुरू होईल. हे केंद्र स्थापन करण्याची जबाबदारी ‘आयआयएमसी’कडे देण्यात आली असून आशियातील हे सर्वात मोठे केंद्र ठरेल, अशी माहिती संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई ‘फिल्मसिटी’जवळ साकारणार ‘कॅम्पस’‘अ‍ॅनिमेशन’, ‘व्हीएफएक्स’, ‘गेमिंग’चे राहणार अभ्यासक्रम‘आयआयएमसी’कडे जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवादाच्या पद्धती व तंत्रामध्ये मागील काळापासून कमालीचा बदल दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने मुंबईच्या ‘फिल्मसिटी’जवळ ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अ‍ॅन्ड कॉमिक्स’ सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. यासंदर्भातील काम सुरू असून येथील ‘कॅम्पस’ २०२१ मध्ये सुरू होईल. हे केंद्र स्थापन करण्याची जबाबदारी ‘आयआयएमसी’कडे देण्यात आली असून आशियातील हे सर्वात मोठे केंद्र ठरेल, अशी माहिती संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी दिली.नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या ‘फिल्मसिटी’त हे ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स’ उभारण्यात येणार आहे व यासाठी महाराष्ट्र शासनाने २० एकर जमीनदेखील दिली आहे. अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अ‍ॅन्ड कॉमिक्स या क्षेत्रांमध्ये प्रचंड रोजगार संधी आहेत. मात्र त्यातुलनेत दर्जेदार अभ्यासक्रम नाहीत. या केंद्रातून वर्षाला १६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ‘पीपीपी’ तत्त्वावर हे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे के.जी.सुरेश यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ‘आयआयएमसी’च्या अमरावती केंद्राचे विभागीय संचालक विजय सातोकर, ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव हे उपस्थित होते.मराठी अभ्यासक्रमांची प्रवेशपरीक्षा आता पाच केंद्रांवर‘आयआयएमसी’ने भाषिक अभ्यासक्रमांवर गेल्या काही काळापासून भर दिला आहे. याअंतर्गत अमरावती येथेदेखील ‘आयआयएमसी’चे विभागीय केंद्र उघडण्यात आले आहे. येथे इंग्रजीसमवेत मराठी अभ्यासक्रमांचेदेखील धडे दिले जातात. मागील वर्षीपर्यंत मराठी अभ्यासक्रमांची प्रवेशपरीक्षा केवळ अमरावती येथेच होत होती. मात्र पुढील सत्रापासून ही परीक्षा अमरावतीसह नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथेदेखील घेण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासोबतच येथील प्रवेशक्षमता १५ वरून २५ करण्याचा प्रस्ताव असल्याचे के.जी.सुरेश यांनी सांगितले. बडनेरा येथे विभागीय केंद्राला १६ एकर जागा मिळाली असून येथे ‘कॅम्पस’ उभारणीचे काम लवकरच सुरू होईल व पुढील तीन वर्षांत ते पूर्ण करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.संस्कृत भाषेतदेखील पत्रकारितेचे धडे‘आयआयएमसी’ने संस्कृत भाषेकडेदेखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. संस्कृत भाषेत वर्तमानपत्रे कमी असली तरी संस्कृत भाषेत ‘ब्लॉग्ज’, ‘सोशल मीडिया’वरील ‘पेजेस’, संकेतस्थळ, ऑनलाईन बातम्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे ‘आयआयएमसी’ने संस्कृत भाषेतदेखील पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘आयआयएमसी’ला लवकच ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळेल. मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून ‘लेटर ऑफ इंटेन्ट’देखील मिळाले आहे. त्यामुळे येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येतील, असेदेखील के.जी.सुरेश यांनी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूर