शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रच्या मिशनला लागले विदर्भात ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 09:52 IST

महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देमेडिकल सोडल्यास सर्वांचे लक्ष्य अपूर्णमेयो, उपजिल्हा रुग्णालय, एनजीओ हॉस्पिटल अपयशी

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे. नागपूरचे मेडिकल सोडल्यास मेयो, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सहा एनजीओ रुग्णालयांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे दिलेले लक्ष्यच गाठता आले नाही. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांना या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याची मदत दिली जाते, तर एनजीओ हॉस्पिटल्सना प्रति रुग्ण हजार रुपये व इतरही शासकीय सोयी पुरविल्या जातात. त्यानंतरही हे रुग्णालय अपयशी ठरल्याने ‘ राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र आहे.दरवर्षी मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्के आहे. एकट्या महाराष्ट्रत १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला घेऊन ‘राष्टÑीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) २,५०० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. केवळ याच रुग्णालयाने लक्ष्य पूर्ण केले. एवढेच नव्हे तर त्यापेक्षा जास्त २,६६१ शस्त्रक्रिया केल्या.मेयोचे केवळ ५५ टक्केच लक्ष्यइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) २००० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु ५५ टक्केच लक्ष्य पूर्ण करीत १०९९ शस्त्रक्रिया केल्या. उपजिल्हा रुग्णालय कामठी, उपजिल्हा रुग्णालय रामटेक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा हॉस्पिटल (ओटी) व शासकीय आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालय मिळून ३,८२५ शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु या सर्वांना मिळूनही लक्ष्य पूर्ण करता आले नाही. २,९४६ शस्त्रक्रियाच केल्या.एनजीओ हॉस्पिटलही उदासीनसार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या  एनजीओ हॉस्पिटलच्या यादीत डॉ. महात्मे आय कॅम्प नागपूरला ३६२५ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु यां हॉस्पिटलने केवळ ३२ टक्के म्हणजे ११७६ शस्त्रक्रिया केल्या. एन.के. हॉस्पिटल व लता मंगेशकर हॉस्पिटलला १८०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य होते. या दोन्ही हॉस्पिटलने ७७ टक्के म्हणजे १३८७ शस्त्रक्रिया केल्या. सूरज आय इन्स्टिट्यूटला १२०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते या इस्पितळाने फक्त २० टक्केच लक्ष्य पूर्ण करीत २४१ शस्त्रक्रिया केल्या. योगीराज हॉस्पिटल, रामटेकला ५५० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते. या हॉस्पिटलने सर्वात कमी म्हणजे ९८ शस्त्रक्रिया केल्या. एस.व्ही. मिशन खापरीला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२७ शस्त्रक्रिया तर इव्हिस्टा आय केअर हॉस्पिटलला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२६ शस्त्रक्रिया केल्या.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य