शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे पायलट म्हणून नरेंद्र मोदी अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:08 IST

विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देहार्दिक पटेल यांची टीका : दीक्षाभूमीला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकºयांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जनता विचारत आहे. अच्छे दिन कुठे आहेत? विमानात जाताना आपण चांगला पायलट असावा, अशी अपेक्षा करतो. प्रवाशांचे जीवन पायलटच्या हातात असते. त्याचप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी लोकांचे भवितव्य पंतप्रधानांच्या हातात असते. परंतु देशाचा पायलट संपूर्णपणे अपयशी ठरला असून आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा पटेल यांनी दिला.पंतप्रधानांना होती पीएनबी घोटाळ्याची माहितीहिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला पीएनबी घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असा आरोप करीत पीएनबी घोटाळ्याबद्दल आपला नाईलाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. यावरून त्यांना या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होते. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना चुप्पी साधणे हा देशद्रोह ठरत नाही काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलnagpurनागपूर