पावसाच्या गीताने रसिक चिंब : कलर्स प्रस्तुत सखी मंच ‘रिमझिम गाणी- झलक सुहानी’ कार्यक्रमनागपूर : बाहेर पाऊसधारा आणि वसंतराव देशपांडे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह...प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष! युवती, महिला, पुरुष सारेच चिंबचिंब...अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक्रम. निमित्त होते कलर्स प्रस्तुत सखी मंचच्यावतीने आयोजित ‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. प्रसिद्ध गायक मो. रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आदींच्या आवाजातील गाणी नागपुरातील उत्कृष्ट गायक कलावंतांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. प्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती आवळे आणि जय कैथवास यांच्या उत्तम नृत्याची या अनुपम कार्यक्रमाला किनार लाभली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन सहप्रायोजक ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार व मंजूषा चकनलवार, पेस आयआयटीचे संचालक मनिषा यमसनवार, रियल इन्स्टिट्यूटचे संचालक शंकर बरडे व माया बरडे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पार्वती नायर हिच्या ‘नैनों मे बदरा छाए...’ या गीताने झाला. त्यानंतर एकापेक्षा एक सुरेख गीत सादर करण्यात आले. प्रसिद्ध गायक सागर मधुमटके यांनी ‘मेरे नैना सावन-भादो...’ व निरंजन बोबडे यांनी क्लासिकल गीत ‘कुहू-कुहू बोले रे कोयलिया...’ सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. १३ वर्षाची ऐश्वर्या नागराजन हिने ‘ओ सजना बरखा बहार आई...’ सादर करून रसिकांची वाहवा लुटली. बोबडे यांच्या ‘अगं बाई..’ या गाण्यावर सखींनी ताल धरला. सागर मधुमटके आणि जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीची विद्यार्थिनी रितिका वड्डादी यांनी ‘भीगी भीगी रात मे...’ गीत सादर केले. त्यानंतर कीर्ती आवळे यांनी ‘ओ रामजी तेरे लखन...’ आणि जय कैथवास याने ‘तुम भी मयखाने...’ या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांना नाचायला भाग पाडले. बारावर्षीय कलावंत आर्य राजूरकर याने ‘एक लड़की भीगी-भागी सी...’ बोबडे, ऐश्वर्या, प्रतीक आणि संजीवनी यांनी ‘काले मेघा-काले मेघा’ पानी तो बरसाओ’ही गीत सादर केले. गीतांना साथसंगत तबल्यावर पंकज यादव, कांगोवर रघुनंदन परसतवार, आॅक्टोपॅडवर सुमंत बोबडे, ड्रम सेटवर सुभाष वानखेडे, सिंथेसायजरवर महेंद्र ढोले व परिमल जोशी, गिटारवर प्रसन्न वानखेडे यांनी दिली. या कार्यक्रमाला ‘ट्रीट आयस्क्रीम’चे विशेष सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी)‘झलक दिखला जा’वर प्रश्नोेत्तरेकलर्स प्रस्तुत सखी मंच ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात कलर्स चॅनलवर सादर करण्यात येत असलेल्या ‘झलक दिखला जा’ या ‘डान्स शो’वर आधारित प्रश्नोतराने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. भारतातील सर्वात मोठा ‘डान्स शो’ ‘झलक दिखला जा’ हा दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्स चॅनलवर सुरू झाला आहे. यात परीक्षकाच्या भूमिकेत प्रसिद्ध कलावंत शाहिद कपूर आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, डान्स गुरु गणेश हेगडे व लॉरेन गॉट्लीब आहेत. या ‘शो’मध्ये १२ सेलिब्रिटी आपले नृत्य सादर करीत आहे.
नैनों में बदरा छाए...
By admin | Updated: July 27, 2015 04:18 IST