शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : नाना पटोले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 18:11 IST

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूर : अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कडकडून टीका केली आहे. जेव्हा जेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्याच यांना सुचतं, असे पटोले म्हणाले.

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपची महाराष्ट्रातून पहाटेची सरकार गेली त्यामुळे ते रात्री स्वप्न न  बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेला अलायन्स  त्यांना हे पटू शकत नाही म्हणून ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. परंतु, हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही. असे म्हणत, आम्ही  केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला, भुकमारी आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या, देशाचा संविधान धोक्यात आला आहे. या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

जनतेला आवाहन- महाराष्ट्रात शांतता ठेवा. ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये भाजपच्या गळाला कोणी लागू नये असे आवाहन पटोले यांनी जनतेला केले.

'सुपारी'वर स्पष्टीकरण

काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आमच्याच मित्रपक्षांनी सुपारी घेतल्याचे वक्तव्यावर पटोले यांनी स्पष्टीकरण दिले असून सुपारी हा शब्द वापरला नसल्याचे म्हटले आहे. 'मी मित्रापासून सावध राहा असं म्हटलं होतं. ही भाषा आमच्या लोकांना कळली तुम्हाला नाही कळणार म्हणत विदर्भात राष्ट्रवादीला फारसे महत्व नाही, हे विदर्भातील जनतेने वारंवर सांगितले आहे', असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा