शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

पुनर्वसनाच्या नावावर आदिवासींना केले विस्थापित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:15 IST

मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आदिवासी एकता परिषद : अमरावतीच्या शेड्युल क्षेत्रातून हटवून आकोटच्या नॉन शेड्युल परिसरात वसविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. गुरुवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमकुमार गेडाम यांनी संगितले की, अमरावती जिल्हा हा शेड्युल ५ मध्ये येतो. येथील १६८४ आदिवासी कुटुंबांना २०१२ मध्ये खोटे आश्वासन देऊन नॉन शेड्युल असलेल्या आकोटमध्ये वसवण्यात आले. त्यांना पुनर्वसनाच्या नियमानुसार वर्षभरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतु आजपर्यंत त्यांना पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, बाजार आणि निवासाचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली. आतापर्यंत २७५ लोकांचा भुकेने बळी गेला आहे. हे आदिवसी कुटुंब अनेक वर्षांपासून आपल्या न्यायासाठी लढत आहेत. पैदल मार्च आणि निवेदन देऊन ते थकले आहेत. रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शेवटी या आदिवासी कुटुंबांनी आपल्या जुन्या गावी परत जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. १७ जानेवारी २०१९ रोजी ते आपल्या गावी आले तेव्हा वन विभाग आणि पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यांच्यावर लाठीहल्ला केला. गोळीबार केला. यात चंपालाल पेठे या आदिवासी नेत्याला गोळी लागली. ३५ आदिवासी जखमी झाले. १९ आदिवासी अजूनही बेपत्ता आहेत. आदिवासींनी आपल्या रक्षणासाठी प्रतिकार केला असता वन अधिकाऱ्यांनी उलट त्यांच्यावरच खोटा आरोप लावला की आदिवासींनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला.प्रसिद्धी माध्यमांमध्येही खोटी माहिती दिली. वन अधिकारी व पोलीस आजही येथील आदिवासींना धमकावीत आहेत. आदिवासी त्यांच्या दहशतीत जगत आहेत. तेव्हा आदिवासींना न्याय मिळावा. मेळघाट येथील आदिवासींचे पुनर्वसन अमरावती जिल्ह्यातच व्हावे, त्यांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येक कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आदिवासींच्या न्यायासाठी परिषदेतर्फे लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून रस्त्यावरची लढाईसुद्धा लढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेत डॉ. सुनील पेंदोर, प्रभुलाल परतेकी उपस्थित होते.

टॅग्स :MelghatमेळघाटTrible Development Schemeआदिवासी विकास योजना