उपराजधानीत रामगिरीवर लागली नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:50 PM2019-12-04T14:50:29+5:302019-12-04T15:13:12+5:30

नागपुरात सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी वेगाने सुरू असून, बुधवारी सकाळी सिव्हील लाईन्स येथील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली.

The name of the new Chief Minister was started on Ramgiri in the sub-capital | उपराजधानीत रामगिरीवर लागली नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी

उपराजधानीत रामगिरीवर लागली नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी वेगाने सुरू असून, बुधवारी सकाळी सिव्हील लाईन्स येथील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली.

अधिवेशनाच्या तयारीला आला वेग
नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे. सध्या दिवसरात्र काम सुरू असून येत्या ७ तारखेपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तब्बल महिनाभर चाललेल्या सत्तानाट्या शेवट होऊन राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन भरवण्याची घोषणाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
त्यानुसार इकडे अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. तसे पाहता अधिवेशनाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरूच होती. नागभवन, रविभवन येथील मंत्र्यांची निवासस्थानांची रंगरंगोटी व डागडुजीची कामे सुरु होती. ती आता जवळपास झालेली आहे. फर्निचर व वस्तू लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत.
आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटदारांची बैठक घेऊन कामासंदर्भात आवश्यक सूचनाही दिल्या.
यात कोणत्याही परिस्थितीत ७ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे.

Web Title: The name of the new Chief Minister was started on Ramgiri in the sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.