शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रुग्णालय पुनरुज्जीवन समितीसाठी तज्ज्ञांची नावे द्या, हायकोर्टाचे सरकारसह इतर प्रतिवादींना निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 13, 2023 17:07 IST

रजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याची मागणी

नागपूर :नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय पुनरुज्जीवन समिती स्थापन करण्यासाठी येत्या २ ऑगस्टपर्यंत वैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नावे सूचवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व इतर संबंधित प्रतिवादींना दिले आहेत.

यासंदर्भात रुग्णालयाचे संस्थापक-सदस्य डॉ. बालचंद्र सुभेदार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गरजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. त्यासाठी न्यायालय विशेष समिती स्थापन करणार आहे. ही समिती आवश्यक सर्वेक्षण करून ही मागणी कशी अंमलात आणता येईल यावर अहवाल सादर करेल.

सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने काही डॉक्टरांनी १९७० मध्ये नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय संस्था स्थापन केली होती. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने २० ऑक्टोबर १९७८ रोजी या संस्थेला रुग्णालय सुरू करण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावरील ५८४२.४८ चौरस मीटरचा भूखंड लीजवर दिला. २४ जुलै २००९ रोजी लीजची मुदत ३१ मार्च २०३२ पर्यंत वाढविण्यात आली. परंतु, हे रुग्णालय २०१० मध्ये बंद पडले.

अपीलवर सुनावणी पूर्ण

रुग्णालय बंद पडल्यामुळे नागपूर सुधार प्रन्यासने ३ जानेवारी २०२० रोजी लीज करार रद्द केला आहे. त्याविरुद्ध संस्थेने नासुप्र कायद्यातील कलम १०८-अ अंतर्गत राज्य सरकारकडे अपील दाखल केले आहे. ११ जुलै २०२३ रोजी त्या अपीलवर सुनावणी पूर्ण झाली आहे. निर्णय राखिव ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयhospitalहॉस्पिटलHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर