शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नावाने बोगस निवडणूक ‘सर्वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:24 IST

लोकसभा-विधानसभा निवडणूक जवळ आल्या की राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात होते. उपराजधानीतदेखील असे चित्र तयार होत असून, चक्क भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्वे’ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण असावा, यासंदर्भात हा ‘सर्वे’ आहे. पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. हा ‘सर्वे’ बनावट असल्याचा दावा करीत पक्षातर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदक्षिण नागपुरातील उमेदवाराबाबत होतेय विचारणा : पक्षाने घेतली पोलिसांत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा-विधानसभा निवडणूक जवळ आल्या की राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात होते. उपराजधानीतदेखील असे चित्र तयार होत असून, चक्क भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्वे’ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण असावा, यासंदर्भात हा ‘सर्वे’ आहे. पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. हा ‘सर्वे’ बनावट असल्याचा दावा करीत पक्षातर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली आहे.इंटरनेटवर ‘स्ट्रॉपोल’ या नावाने ‘ऑनलाईन सर्वे’चे एक संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरच हा ‘सर्वे’ दक्षिण भाजपातर्फे घेण्यात येत असल्याचे नमूद आहे. ‘२०१९ मध्ये दक्षिण नागपूरचा आमदार कोण असावा’ असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यात विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते, आशिष वांदिले व रवींद्र भोयर यांची नावे आहेत. यापैकी एका नावाची निवड करण्याचे यात सांगण्यात येत आहे. या ‘सर्वे’मध्ये आतापर्यंत ५०७ जणांनी आपले मत व्यक्त केले आहे.ही बाब लक्षात येताच भाजपचे महानगर सोशल मीडिया सेलतर्फे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा ‘सर्वे’ पक्षाचा नसून कुणी तरी जाणूनबुजून हा प्रकार करीत आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे.गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्नसंबंधित ‘सर्वे’ हा गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. पक्षाशी याचा काहीही संबंध नाही. ‘स्ट्रॉपोल’ हे मोफत संकेतस्थळ असून, वापरासंबंधीच्या दिशानिर्देशानुसार यावर राजकीय ‘सर्वे’ करता येत नाही. शिवाय यात पक्षाचे नाव वापरण्यात आले असल्याने हा ‘आयटी अ‍ॅक्ट-२०००’च्या कलम ६६ डी, ६७ तसेच ‘आयपीसी’च्या कलम ४१५ नुसार गुन्हा ठरू शकतो, असा दावा भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख केतन मोहितकर यांनी केला आहे.पक्षातील स्पर्धा की खोडसाळपणा?दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण नागपूरसह शहरातील पाच जागांवर उमेदवारीसाठी विद्यमान आमदारांसह इतरही पदाधिकारी इच्छुक आहेत. अशास्थितीत हा ‘सर्वे’ पक्षातील अंतर्गत स्पर्धेतून करण्यात येत आहे की यात बाहेरील तत्त्वांचा खोडसाळपणा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BJPभाजपाfraudधोकेबाजी