शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपालिका नगरसेवकाचे नालीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:17 IST

कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली.

ठळक मुद्देप्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी : विकास कामात पक्षपात केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब टेळे यांनी त्यांच्या प्रभागाची पाहणी करून तिथे नालीच्या बांधकामाला सुरुवात केली. तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते.कामठी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी आपल्या प्रभाग क्रमांक १४ मधील विविध विकास कामांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता भाजपचे लालसिंग यादव यांना केला. प्रभाग क्रमांक - १४ मध्ये रोडच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून, तो अपघातांना निमंत्रण देत आहे. सत्ताधारी या प्रभागाच्या विकासाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या प्रभागातील रोड, नाल्या, पिण्याचे पाणी, पथदिवे, कचरा व घाणीची विल्हेवाट यासह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत, असेही लालसिंग यादव यांनी सांगितले.या प्रभागांतर्गत येणाऱ्या यादवनगरात नालीवरील स्लॅब तुटल्याने खड्डा पडला आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे चारदा लेखी तक्रारी केल्या. परंतु, पालिकेच्या बांधकाम विभागाने त्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत यादव यांनी सांगितले की, या खड्ड्यामुळे अपघात झाले असून, सत्ताधाऱ्यांकडून या प्रभागातील नागरिकांवर वारंवार अन्याय होत आहे. न्याय मिळत नसल्याने आपण शेवटी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी मुख्याधिकारी बाळासाहेब टेळे यांनी प्रभाग क्रमांक - १४ ची पाहणी केली. शिवाय, या भागातील नाल्यांच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात केली. मात्र, यादव यांचे आंदोलन सुरूच होते.

टॅग्स :agitationआंदोलनcivic issueनागरी समस्या