शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नाईक घराण्यातील नीलय यांना भाजपाकडून उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:16 IST

राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अ‍ॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे.

नागपूर : राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अ‍ॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे. शिवसेनेने अनिल परब यांना आधीच उमेदवारी दिली असून दुसरा उमेदवार म्हणून पक्ष प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.भाजपाकडून उमेदवारी मिळालेले नीलय नाईक यांनी दीड वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे ते नातू तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व पुसदचे विद्यमान आमदार व माजी मंत्री मनोहर नाईक यांचे ते पुतणे आहेत. बंजारा समाजाच्या व्होट बँकेवर नजर ठेवून भाजपाने नीलय यांना उमेदवारी दिल्याचे मानले जाते.नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष असलेले रातोळीकर हे निष्ठावंत भाजपाजन मानले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्याला भाजपाने विधान परिषदेत प्रतिनिधित्व दिले आहे. भाजपाचे अन्य एक उमेदवार रमेश पाटील हे कोळी समाजाचे नेते आहेत. त्यांना ऐनवेळी भाजपात आणून उमेदवारी देण्यात आली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत.११ जागांसाठी १६ जुलैला ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने विद्यमान सदस्य शरद रणपिसे आणि यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना तर राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान सदस्य शेकापचे जयंत पाटील हेही रिंगणात असतील.ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असले तरी राजकीय खेळीचा भाग म्हणून भाजपाकडून उद्या पृथ्वीराज देशमुख यांचा सहावा अर्ज भरला जाऊ शकतो. तो दबावतंत्राचा एक भाग असेल. अन्य कुठल्याही पक्षाने जादाचा उमेदवार उभा केला तर भाजपाकडून सहावा उमेदवार कायम राखला जाईल. मात्र, अन्य कुणीही जादाचा उमेदवार दिला नाही तर भाजपाचाही सहावा उमेदवार माघारघेईल.

टॅग्स :BJPभाजपा