शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

नागपूरचे  झिरो माईल्स मेट्रो स्टेशन ठरणार आकर्षणाचे केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:04 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे२० मजली इमारत : विविध मजल्यावर २२४ कारचे पार्किंग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.हेरिटेज वॉकद्वारे कनेक्टिव्हिटी२० मजली स्टेशनच्या इमारतीत खासगी हॉटेल्स, रेस्टॉरंट, व्यावसायिक स्थळे, कार्यालये, बँक्वेट हॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. १२ हजार चौरस मीटर जागेवर बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मेट्रो स्टेशन राहणार आहे. ५,३०० चौरस मीटर जागेवर जवळपास ४,५०० चौरस मीटरचे बांधकाम वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. स्टेशनवर पोहोचण्यासाठी स्टेशन बाहेरील परिसरात आकर्षक हेरिटेज वॉक तयार करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांना स्टेशनपर्यंत पोहोचविण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळेल. स्टेशनरील भिंती, प्रवेश व निर्गमन संरचनाचे कार्य नियोजित वेळेत पूर्ण केले जात असून आतापर्यंत झालेल्या कार्याप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे वेळोवेळी बांधकामाची पाहणी करण्यात येत आहे. स्टेशनच्या बांधकाम कार्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची परिपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.आठ एस्केलेटर, दहा लिफ्टस्टेशनवर तळमजल्यासह एकूण २० मजली इमारत प्रस्तावित आहे. या भव्य इमारतीत आठ एस्केलेटर आणि दहा लिफ्टची सोय राहील. नागपूर शहराच्या मध्यभागी पार्किंगची समस्या लक्षात घेता इमारतीत वाहनांच्या पार्किंगसाठी भरपूर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टेशनच्या विविध मजल्यावर २४४ कार सहज पार्क करता येतील. तसेच दुचाकी वाहनासाठीदेखील पर्याप्त जागा राहील. ज्याप्रमाणे खापरी मेट्रो स्टेशन व्हिक्टोरियन वास्तुकलेच्या शैलीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे मेट्रोच्या या २० मजली झिरो माईल स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी ठरणार आहे.स्केटर्सनी दिला स्वच्छता व रस्ता सुरक्षेचा संदेशमहामेट्रो नागपूर आणि गांधीबाग स्केटिंग क्लबतर्फे गुरुवारी नागपूर मेट्रोशी संबंधित कार्यगुणांची ‘स्केटिंग संदेश रॅली’ आणि या कार्यविभागातील नागरिकांसाठी ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. स्केटर्सनी स्वच्छता आणि रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. सुनील तिवारी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक दयाशंकर तिवारी, शैलेन्द्र पाराशर, उपेंद्र वर्मा व महामेट्रो नागपूरच्या रिच-४ चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एम. सुरेश, वरिष्ठ सेक्शन अभियंते राजेश तभाने, स्केटर्स आणि नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोZero Mileझीरो माईल